परंडा (प्रतिनिधी)- श्री तुळजाभवानी कृषी महोत्सव 2026 चा दिमाखदार शुभारंभ 24 फेब्रुवारी 2026 रोजी जिल्हाधिकारी डॉ.किर्ती किरण पुजार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले असून हा महोत्सव 25 फेब्रुवारी 2026 पर्यंत तुळजापूर येथे आयोजित करण्यात आला असून आज रोजी भोंजा हवेली येथील गटाच्या महिलांनी आवर्जून भेट दिली.

या महोत्सवाबद्दलचा कालावधी 24 आणि 25 फेब्रुवारी 2026 आयोजक महाराष्ट्र शासन कृषी विभाग, आत्मा विभाग गटातील सदस्यांना सोबत घेऊन संयुक्त विद्यमाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे शेतकऱ्यांची शाश्वत प्रगती साधणे जैविक शेंद्रीय शेतीला भर आणि शेतीमालाला योग्य बाजारभाव मिळवून देणे.

आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार करणे हवामान बदल आणि वाढता उत्पादन खर्च यांसारख्या आव्हानांचा सामना करण्यासाठी शेतकऱ्यांना सक्षम करणे व कृषी क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळींकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन शासकीय योजनांची माहिती देणारी मल्टीमीडिया प्रदर्शनेधाराशिव जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आधुनिक यंत्रसामग्री आणि शेती पद्धतींचे अधिका अधिक फायदा होण्यासाठी शेतकऱ्यांना हे व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यात आले. यावेळी गटाच्या महिला सदस्यांची कृषी विभाग अधिकारी यांनी शुभेच्छा दिल्या यावेळी विभागीय कृषी सहसंचालक महेश तिर्थकर, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी राजकुमार मोरे, प्रकल्प संचालक आत्मा विभाग विष्णू मिसाळ, उपसंचालक आसलकर, कृषी विभागाचे सोनटक्के ,तालुका कृषी अधिकारी नानासाहेब लांडगे, मंडळ अधिकारी थोरबोले ,सहाय्यक कृषी अधिकारी विनोद भाग्यवंत, आत्मा विभाग तालुका समन्वयक अमोल पाटील, पाटील बुवा जिल्हा परिषद प्रोडुसर कंपनी लि भोंजा हवेली डायरेक्टर गणेश नेटके व गटातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

 
Top