भूम (प्रतिनिधी)- भूम तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थिनींना शाळेत येण्यासाठी सीसीआयएल व सेवा संयोग फाउंडेशन यांच्यावतीने तालुक्यातील वीस जिल्हा परिषदेचे परिषदेच्या शाळेतील मुलींना 125 सायकलीचे वाटप होणार आहे. आलमप्रभू देवस्थान सभागृह येथे तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी राहुल भट्टी यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम सकाळी दहा वाजता सुरू होणार असून, प्रमुख पाहुणे म्हणून आलम प्रभू देवस्थान विश्वस्त मंडळ दिलीप शाळु, रमेश मस्कर, शिक्षण विस्तार अधिकारी सोमनाथ टकले सूर्यकांत साळुंखे, सेवासयोग फाउंडेशनचे जिल्हा समन्वयक विनोद सुरवसे श्रीराम केसकर हे उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमासाठी 20 जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी शाळेचे मुख्याध्यापक व्यवस्थापन समिती सदस्य पालक शिक्षक वर्ग उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती सेवा सहयोग फाउंडेशन तालुका समन्वयक संतोष तोडकरी यांनी दिली. शहरातील सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे सत्येंद्र मस्कर व महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे नेते दत्तात्रय गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न होत असून गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे.