भूम (प्रतिनिधी)- भुम जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये मोठी अटीतटीची लढत पहावयास मिळाली. जिल्हा परिषद गटामध्ये निवडणुकीचा निकाल धाकधुकीमध्ये लागल्याने कार्यकर्त्यांमध्ये काही ठिकाणी उत्साह तर काही ठिकाणी निराशा आली.
भूम तालुक्यातील पाच जिल्हा परिषद गटामध्ये तीन जिल्हा परिषद गट शिवसेना शिंदे गटाकडे तर दोन जिल्हा परिषद गट राष्ट्रवादी गटाकडे आहेत. तर पंचायत समितीमध्ये वंचित बहुजन आघाडी एक, अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस चार व शिवसेना शिंदे गट पाच याप्रमाणे निवडून आले आहेत .
यामध्ये ईट गटामधून शुभांगी सुनील देशमुख (राष्ट्रवादी अजित पवार गट - 4 931), पाथरूड अमोल भोरे (राष्ट्रवादी अजित पवार गट 7562), सुकटा विजयमाला भाऊसाहेब मार्कड (शिवसेना शिंदे गट 7016), वालवड बालाजी काळे (शिवसेना शिंदे गट 6716), आष्टा साधना बापूसाहेब अंधारे (शिवसेना शिंदे गट 7746), दहा पंचायत समिती गणांमधील विजय उमेदवार पखरुड गण प्रियंका प्रवीण रणबागुल (वंचित बहुजन आघाडी -3065), लिमकर राजकन्या (शिवसेना शिंदे गट 2034), ईट गण बाळासाहेब खरवडे (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट 3885) प्रवीण देशमुख (शिवसेना शिंदे 2253), सुकटा गण कृष्णा गोयकर (शिवसेना शिंदे गट 2748) दत्तात्रय लवटे (राष्ट्रवादी अजित पवार गट 2678), आरसोली गण प्रशांत मुंढेकर (शिवसेना शिंदे गट 3907) कुमार शाहूराव तांबे (अजित पवार गट 3034), पाथरूड गण प्रदीप शेळके (अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस 2995) समाधान मोरे (शिवसेना शिंदे गट 2073), आंबी गण प्रियंका युवराज गटकळ (अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस 3398) रतन गायकवाड (भाजपा 2135), वालवड गण साधना सुबुगडे (शिवसेना शिंदे गट 3972 ) वैशाली बारस्कर (अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस 2783), चिंचोली गण श्रीलता संतोष लोखंडे (शिवसेना शिंदे गट 2783) आगारावती गायकवाड (वंचित बहुजन आघाडी 2535), आष्टा गण पूजा विशाल ढगे (शिवसेना शिंदे गट 4165) अश्विनी कदम (अजित पवार गट 2571), माणकेश्वर गण मनोज अंधारे (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट 2856) बालाजी गुंजाळ (शिवसेना शिंदे गट 2600).
अटीतटीच्या लढतीमध्ये जिल्हा परिषद मध्ये शिवसेना शिंदे गटाने बाजी मारली तर पंचायत समिती निवडणुकीमध्ये समसमान जागा देत कोणालाही स्पष्ट बहुमत मिळाले नाही त्यामुळे पंचायत समिती साठी फोडाफोडीचे राजकारण पुढील काळामध्ये पहावयास मिळणार आहे .पंचायत समिती सभापतीपद सर्वसाधारण साठी राखीव असल्याने मोठ्या प्रमाणात रस्सीखेच होऊन मागील निवडणुकीमध्ये शिवसेनेने बाजी मारली होती त्याप्रमाणेच आताही शिवसेना बाजी मारते का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे .
मतमोजणी वेळी निवडणूक निर्णय अधिकारी रैवायाह डोंगरे ,सहाय्यक निवडणूक अधिकारी जयवंत पाटील, प्रवीण जाधव, अमोल नरुटे, उपविभागी पोलीस अधिकारी अनिल चोरमले, पोलीस निरीक्षक गणेश कानगुडे यांच्यासह अधिकारी कर्मचारी यांनी शांततेत व सुरळीत मतमोजणी पार पाडली.
