कळंब (प्रतिनिधी)-  तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या 8 गट व पंचायत समिती 16 गणांच्या मतमोजणीची प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार हेमंत ढोकळे यांच्या सहअधिकाऱ्यांच्या समावेत  आज संतश्रेष्ठ गोरोबाकाका शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे पार पडली. या निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या 8 गटांपैकी भाजप-शिंदे सेनेचे 6 तर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे 2 उमेदवार विजयी झाले. पंचायत समितीच्या 16 गणांमध्ये भाजप-शिंदे सेना व उद्धव ठाकरे गट यांना प्रत्येकी 8 जागा मिळाल्या. विशेष म्हणजे काँग्रेस व दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांना खातेही उघडता आले नाही.पंचायत समितीच्या 16 गणांमध्ये भाजप-शिंदे सेना व उद्धव ठाकरे गट यांच्यात काट्याची टक्कर पाहायला मिळाली. दोन्ही बाजूंना प्रत्येकी 8 जागा मिळाल्याने पंचायत समितीत सत्तेसाठी मोठी रस्सीखेच होण्याची चिन्हे आहेत


जिल्हा परिषद गटांचे निकाल 

ईटकूर गट : शिंदे सेनेचे अनंत लंगडे यांनी उद्धव ठाकरे गटाच्या पल्लवी तांबारे यांचा सुमारे 2000 मतांनी पराभव केला. मंगरूळ गट : भाजपचे जयवंत कुंभार यांनी उ बाटा गटाचे बाळासाहेब जाधवर यांना 887 मतांनी पराभूत केले. डिकसळ गटा तुन शिंदे सेनेची पूजा तुषार शिंदे यांनी उबाटा गटाच्या वर्षा मस्के यांचा 1396 मतांनी पराभव केला. शिराढोण गट : उद्धव ठाकरे गटाच्या कांचनमाला संगवे यांनी राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचे नितीन यादव यांना अवघ्या 35 मतांनी हरवले. नायगाव गटामधून उद्धव ठाकरे गटाचे अनिल साळुंखे यांचा भाजपाचे उद्धव शितोळे पाटील यांनी 113 मतांनी पराभव केला.

खामसवाडी गटातुन भाजपचे विश्वास कोकणे यांनी उबाटा गटाचे  मनीषा वाघमारे यांना 459 मतांनी पराभूत केले. मोहा गटातून उद्धव ठाकरे गटाच्या रूपाली नाकटिळक यांनी अपक्ष उमेदवार  सुजाता मडके यांचा 1275 मतांनी पराभव केला. येरमाळा गटातुन  भाजपच्या अनुजा कोकाटे यांनी उबाटा च्या सुनंदा वाघमारे यांचा 1350 मतांनी हरवले.


पंचायत समिती गणांचे निकाल

ईटकूर : रामचंद्र सांगळे (भाजप) विजयी; मस्सा : राजश्री वरपे (शिंदे सेना) विजयी, मंगरूळ : प्रणिता चव्हाण (भाजप) विजयी, हसेगाव (के) : राणी राऊत (शिंदे सेना) विजयी, डिकसळ : नामदेव जाधव (शिंदे सेना) विजयी, लोटा (पूर्व) : इंदुबाई ओव्हाळ (भाजप) विजयी, शिराढोण : गजानन माकोडे (भाजप) विजयी, जवळा खुर्द : मनोज घोगरे (उद्धव गट) विजयी, नायगाव : सीमा टेकाळे (उद्धव गट) विजयी, रांजणी : योगेश्वरी पवार (उद्धव गट) विजयी; खामसवाडी : सुवर्णा पाटील (उद्धव गट) विजयी, देवळाली : उमाकांत एडके (उद्धव गट) विजयी, मोहा : अनुराधा दिघे ( उबाटागट) विजयी, गौर : श्याम देशमुख (उद्धव गट) विजय, येरमाळा : वृषाली पाटील (उद्धव गट) विजयी, चोराखळी : अलका खुणे (भाजप) विजयी; झाल्या आहेत. 


तालुक्यात बदलणारी राजकीय समीकरणे

जिल्हा परिषदेत मिळालेल्या घवघवीत यशामुळे कळंब तालुक्यात भाजप-शिंदे सेनेचे वर्चस्व अधिक मजबूत झाले आहे. दुसरीकडे काँग्रेस व राष्ट्रवादीला एकही जागा न मिळाल्याने त्यांच्या संघटनात्मक ताकदीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पंचायत समितीत मात्र बरोबरी झाल्याने सत्तास्थापनेसाठी राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे. 

निकाल जाहीर होताच विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी जल्लोष करत गुलाल उधळला, तर पराभूत गटांमध्ये आत्मपरीक्षणाची चर्चा सुरू झाली आहे. कळंब तालुक्याच्या राजकारणात हा निकाल मोठा टर्निंग पॉइंट ठरणार असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.

या निकालामुळे तालुक्यात भाजप-शिंदे सेनेने जिल्हा परिषदेत स्पष्ट वर्चस्व मिळवले असून पंचायत समितीत मात्र समसमान ताकद निर्माण झाली आहे. निकालानंतर विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी जल्लोष केला असून पुढील सत्तास्थापनेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.विजयी उमेदवारांनी मात्र शहरातून गुलाल उधळत जल्लोष साजरा केला तर अनुचित प्रकार घडू नये म्हणून कळंब पोलिसांनी चोक पोलीस  बंदोबस्त ठेवला होता.  


मतमोजणी प्रक्रियेवर निवडणूक निर्णय अधिकारी  तथा उपविभागीय अधिकारी गणेश शिंदे .सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार  हेमंत ढोकले,अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी पंडित जाधव,  मुख्याधिकारी नगर परिषद, श्रीमती मंजुषा गुरमे,निवडणूक निरीक्षक तथा अप्पर जिल्हाधिकारी बीड हरीष धार्मिक व नायब तहसिलदार  गोकुळ भराडीया ,नायब तहसीलदार गोपाळ तापडिया ,नायब तहसीलदार श्रीमती  किरण फुले यांच्या नियंत्रणा खाली महेश माने, प्रदीप ठोंबरे, शंकर पाच भाई ,गणेश गपाट, दिनेश मंडलिक,  खलील शेख यांनी ही मतमोजणी प्रक्रिया पार पडली आहे.


पोलिस प्रशासनाने  उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पवार,पोलीस निरीक्षक अजित चिंतले,  सहाय्यक पोलीस निरीक्षक-4, पोलीस उपनिरीक्षक-3,  पोलीस कर्मचारी - 40एस .आर . पी . एफ . शिराढोण पोलीस , येरमाळा पोलीस, सायबर पोलीस ,बीड पोलीस , दंगल नियंत्रण पथक असे एकूण  मिळून 117 पोलीस कर्मचारी यांची बंदोबस्तासाठी नेमणूक करून शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता .

 
Top