वाशी (प्रतिनिधी)- बुधवारी(दि.25) रोजी मौ. तेरखेडा येथील प्रिन्स फायर वर्क्स या कारखान्याच्या परिसरात NDRF team Pune व SDRF team धुळे यांच्यडूनअनेक वेगवेगळ्या नैसर्गिक आपत्ती चे व्यवस्थापन कसे करायचे याचे प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी कार्यक्रम चे अध्यक्ष तहसीलदार प्रकाश म्हेत्रे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून NDRF टीम पुणे चे प्रमुख कमांडर राहुलकुमार रघुवंश व SDRF टीम धुळेचे प्रमुख PSI शंकर उकंडे व येरमाळा पोलीस स्टेशनचे झख भालेराव हे होते.
यामध्ये अगदी रक्तप्रवाह कसा रोखून ठेवायचा इथपासून ते जखमी पेशंट ला कसे पकडायचे आणि आहे त्या परिस्थिती मध्ये स्टेचर कसे तयार करायचे हेही प्रात्यक्षिक द्वारे दाखवण्यात आले.. तसेच गॅस आग विझवणे, अटॅक आल्यावर CPR कसा दयावा याचेही प्रशिक्षण देण्यात आहे.तसेच स्वतः ला भाजल्यावर स्वतः जमिनीवर झोपून कशा प्रकारे आग विझवण्याचा प्रयत्न करायचा हेही प्रात्यक्षिक दाखवले.
या प्रशिक्षणास कारखाना संघटनेचे अध्यक्ष फरीद पठाण सर यांनी खूप मोलाचे सहकार्य केले. तसेच संपूर्ण NDRF टीम व SDRF टीम यांनीही खूप सोप्या व उत्कृष्ट पद्धतीने प्रशिक्षण दिले.यावेळी तेरखेडा व आजूबाजूच्या परिसरातील अंदाजे 200 ते 250 कारखानदार व मजूर कामगार उपस्थित होते.तसेच हा कार्यक्रम उत्तम प्रकारे पार पडण्यासाठी तेरखेडा मंडळातील ग्राम महसूल अधिकारी पालके,गायकवाड, सावंत,मस्के, सुप्रिया भोसले आणि अनुराधा देशमुख आणि मंडळाधिकारी तेरखेडा ढवारे तसेच महसूल सेवक खोत, आलम सय्यद व बळवंत यांनी महत्वाचे कार्य पार पाडले.
