भूम(प्रतिनिधी)- नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवारां विरोधात स्वपक्षातील लोकांनी गद्दारी करून विरोधकांबरोबर हातमिळवणी केल्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना हार पत्कारावी लागली. याबाबत सर्व जिल्हा परिषद व पंचायत समीती उमेदवारांची मंथन बैठक भूम येथे पार पडली आहे.
दिनांक 17 रोजी भूम येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पाच जिल्हा परिषद गट व दहा पंचायत समिती गणातील उमेदवारांची नुकतीच बैठक पार पडली. या वेळी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूक काळामध्ये कोणी कोणी शिवसेना पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात काम केले. त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. तसेच संघटनात्मक बांधणी करून आगामी येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांना बळ द्यावे. याससह अनेक विषयावर चर्चा करण्यात आली.
यावेळी आष्टा जि. प. उमेदवार महिला जिल्हाप्रमुख जिन्नत सय्यद, वालवड जिल्हा परिषद उमेदवार उर्मिला अशोक वनवे, सुकटा जि.प. उमेदवार लक्ष्मी बबन जानकर,पाथरूड जि. प.उमेदवार शंकर नागरगोजे, पाथरुड प.स. उमदेवार उपजिल्हा प्रमुख डॉ. चेतन बोराडे,चिंचोली प.स.उमेदवार ज्योती प्रल्हाद आडागळे., वालवड प. स. रुकसान अब्दुल सय्यद, सुकटा प.स. उमेदवार जिल्हा सहसंघटक भगवान बांगर, अंभी प.स. उमेदवार ॲड.रविंद्र नागरगोजे, आष्टा प.स. उमेदवार विकास ढगे, मानकेश्वर प.स. उमेदवार बापू माळी, पखरूड प.स. राजेभाऊ नलावडे, ईट प.स. श्रीमंत डोके, शिक्षक सेना राज्य संघटक कोहीनुर सय्यद, विधानसभाप्रमूख प्रल्हाद आडागळे, माजी शहरप्रमुख दिपक मुळे, विहंग कदम, बाळासाहेब गुळवे, उपतालुकाप्रमुख श्रीमंत भडके, लहू गोरे, डिंगांबर ढगे, बाळासाहेब औताडे, यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये ज्यांनी ज्यांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात काम केल्याने पक्षाला हार पत्करावी लागली त्या अनुषंगाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व शिवसेना नेते, धाराशिव जिल्हासंपर्क नेते अंबादास दानवे व इतर पक्ष श्रेष्ठींबरोबर चर्चा करून पक्षाच्या विरोधात काम करणाऱ्यांना पदावरून पाय उतार करून लवकरच संघटनात्मक बांधणी करून निष्ठावंत शिवसैनिकांना न्याय देणार असल्याचे धाराशिव जिल्हा संपर्कप्रमुख सुनील काटमोरे यांनी दुरध्वनी व्दारे सांगितले आहे.
