धाराशिव (प्रतिनिधी)- हिंदुस्थानचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यकर्तृत्वाचा उजाळा शालेय विद्यार्थी विद्यार्थिनींना व्हावा या उद्देशाने धाराशिव शहरातील आर्य चाणक्य माध्यमिक विद्यालयात सामान्य ज्ञान चाचणी घेण्यात आली.

यानिमित्ताने प्रशालेतील सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनींनी या सामान्य ज्ञान चाचणीत सहभागी होऊन श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्र तसेच त्यांच्या कार्यकर्तृत्वावर विचारलेल्या विविध प्रश्नांना आपल्या ज्ञान कौशल्यातून साकारले. या सामान्य ज्ञान चाचणी परीक्षेत प्रशालेतील इयत्ता पाचवी ते नववी मधील सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. अशा प्रकारचा हा नावीन्यपूर्ण उपक्रम यावर्षी प्रशालेत पहिल्यांदाच आयोजित करण्यात आला होता. 


 
Top