धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई, यांच्या वतीने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांतील शाळांमध्ये मुलींसाठी राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा अभियानांतर्गत प्रशिक्षण देण्यात येत आहे.
या प्रशिक्षणामध्ये मुलींना स्व संरक्षणासाठी आवश्यक विविध प्रकारातील प्रशिक्षण प्रशिक्षका मार्फत देण्यात येत आहे. राज्यातील मुलींना प्रशिक्षक हे अधिकाधिक अद्यावत व परिपूर्ण प्रशिक्षण देत आहेत. त्या मधीलच एक भाग म्हणून मुलींना योगा चे प्रशिक्षण देण्यात येत आहे. योगा मुळे मुलीनं मध्ये उत्साह आणि आणि मनोबल वाढलेले दिसून येत आहे. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या संकल्पनेतून व राष्ट्र प्रथम या ध्येयातुन मुलींना प्रशिक्षण देणे सुरु आहे. प्रशिक्षणाद्वारे मार्गदर्शन व सराव करून घेतला जात आहे. मुलींना आत्मसंरक्षण व आत्मविश्वास वाढीसाठी हा उपक्रम महत्त्वकांक्षी ठरणार असल्याचा विश्वास शिक्षण विभागाच्यावतीने व्यक्त करण्यात आला.