धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक 2026 शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व काँग्रेस आय आघाडीचा जिल्हाभर जनतेशी थेट संवाद आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक 2026 च्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व काँग्रेस आय आघाडीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ धाराशिव जिल्ह्यात विविध ठिकाणी मतदारांशी थेट संवाद साधत प्रचारसभा पार पडल्या.

औसा तालुक्यातील हसेगाव, कार्ला व गुबाळ, कळंब तालुक्यातील येरमाळा व दहिफळ, परंडा तालुक्यातील लोणी, कंडारी, डोंजा (बू.) व चिंचपुर (बू.), भूम तालुक्यातील पाथरूड तसेच वाशी तालुक्यातील पारगाव येथे या सभा उत्साहात पार पडल्या या सर्व सभांमध्ये रस्ते, पाणीपुरवठा, वीज, आरोग्य सेवा, शिक्षण, ग्रामविकास, शेतकरी प्रश्न, महिला सक्षमीकरण तसेच युवकांसाठी रोजगाराभिमुख उपक्रम अशा विविध विकासकामांचा ठोस व वस्तुनिष्ठ लेखाजोखा जनतेसमोर मांडण्यात आला. “आम्ही केवळ आश्वासनांचे नाही तर प्रत्यक्ष कामांचे राजकारण करतो. केलेल्या विकासकामांच्या विश्वासावरच ही निवडणूक लढवत आहोत,” अशी ठाम भूमिका यावेळी मांडण्यात आली.

या प्रचारसभांमध्ये पुढील उमेदवारांच्या प्रचारार्थ जनतेशी संवाद साधण्यात आला औसा तालुका : सौ. अरुणा संतोष सोमवंशी, लालासाहेब बब्रुवान साळुंके, पंचफुलाबाई सुधाकर घोडके, श्री. तानाजी भानुदास जाधव, श्री. विलास व्यंकटराव काळे, प्रवीण बिभीषण जाधव. कळंब तालुका : सौ. सुनंदा सुब्राव वाघमारे, सौ. वृषाली राहुल पाटील, ओव्हाळ शिल्पा भगवान, सौ. रुपाली बाळाजी नागटिळक, सौ. अनुराधा राहुल दिगे, श्री. श्याम रंगनाथ देशमुख परंडा तालुका : सौ. ताराबाई गोपीनाथ सोदाळे, सौ. राणी रेवनाथ ढोरे, कु. डॉ. धनश्री विश्वास लोकरे, श्री. वशिष्ट माणिक जतकर, सौ. किसकिंदा बाळासाहेब देशमुख, सौ. कल्पना बुद्धीवाण गोडगे, श्री. बालाजी शिवाजी गंगाविठ्ठल, श्री. तुषार शिवाजीराव गोफणे (पाटील), श्री. तानाजी कल्याण पाटील, श्री. युवराज रणजीतसिंह पाटील, श्री. शिवाजी नवनाथ कासारे भूम तालुका : श्री. शंकर तुळशीराम नागरगोजे, डॉ. चेतन वासुदेव बोराडे, सौ. सरिता रविंद्र नगरगोजे वाशी तालुका : सौ. वर्षा तात्यासाहेब गायकवाड, ॲड. अनुराधाताई महेश आरवाडे उमेदवारांनी प्रामाणिक सेवा, पारदर्शक कारभार आणि लोकहितासाठी कटिबद्ध राहण्याची ग्वाही दिली या सर्व सभांना शिवसैनिकांसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top