भूम (प्रतिनिधी)-  भूम शहर सार्वजनिक शिवजयंती महोत्सव 2026 च्या अध्यक्षपदी नगरसेवक यशवंत थोरात यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. शिवजयंती महोत्सवाच्या कमिटी निवडीसाठी नुकतीच कल्याण स्वामी मठ येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. 

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे रमेश मस्कर, नगरसेवक रुपेश शेंडगे, अनिल शेंडगे, सत्येंद्र मस्कर, नगरसेवक रामराजे कुंभार, अजय मस्कर यांच्या प्रमुख उपस्थितीत या कमिटीचे निवड करण्यात आली. यामध्ये उपाध्यक्षपदी रामराजे कुंभार, अजय बाबुराव शेंडगे, खजिनदार निलेश भोळे, पांडू हूरकुडे, सचिन भोळे, सचिव पदी ऋतिक वीर, बालाजी गाडे, अमित मस्कर, प्रवीण शेंडगे, सहसचिव पदी अनिकेत ठाकरे, शंकर शेंडगे, वैभव भोळे, राहुल पवार यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. तसेच मिरवणूक प्रतिनिधी म्हणून प्रतीक मस्कर, आदित्य भोळे, राहुल शेळके, राहुल भोळे, राहुल शेंडगे, दिनेश मस्कर, कृष्णा गुळमे, सिद्धार्थ गाडे, रोहित खोसे, अक्षय डीसले, अश्वजीत पवार यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी युवक व ज्येष्ठ नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.


 
Top