धाराशिव (प्रतिनिधी)-   महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने युरोपमधील कृषी अभ्यास दौऱ्यासाठी पत्रकार धनंजय रणदिवे यांची निवड झाली आहे. 16 फेब्रुवारी रोजी कृषी अभ्यासकांची टीम युरोपला रवाना होणार आहे.

कृषी विभागाच्या सहसंचालक कार्यालयाकडून या संदर्भात माहिती दिली आहे. यावर्षी युरोप मधील कृषी अभ्यास दौऱ्यात फ्रान्स, जर्मनी, स्वीर्झलँड, नेदरलँड आदी देशातील अत्याधुनिक शेती, नविन तंत्रज्ञान, याद्वारे केली जाणारी शेती याची माहिती घेतली जाणार आहे. यामध्ये धान्य पीक शेती, आधुनिक दुग्धशाळा, स्थानिक तज्ञांशी चर्चा, द्राक्ष बाग, वाईन प्रक्रीया पाहणी, बागायती संशोधन केंद्र पाहणी, दूध प्रक्रिया संस्थांना भेटी, पर्वतीय दुग्धशाळा भेटी, चराई पद्धत, उंच प्रदेशातील पशूपालन, चीज प्रक्रिया केंद्र पाहणी, होहेनहाइम विद्यापीठ संधोधन केंद्र भेट (जर्मनी), दुग्ध संशोधन शेत व पारंपारिक दुग्धशाळा भेट, आल्समीट फूल बाजार, आधुनिक हरितगृह, मत्स्यपालन प्रकल्प पाहणी, बागायती इनोन्हेशन सेंटर आदींची पाहणी राहणार आहे. युरोप दौरा 16 ते 27 फेब्रुवारी असा 12 दिवसांचा राहणार आहे.या निवडीबद्दल रणदिवे यांचे जिल्हाधिकारी किर्ती किरण पूजार, कृषी सह संचालक पूनम खटावकर, जिल्हा कृषी अधीक्षक राजकुमार मोरे, उपाधीक्षक आसलकर आदींनी कौतुक केले आहे.

 
Top