भूम (प्रतिनिधी)- जेएसपीएम पुणे संचलित बार्शी येथील भगवंत इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी (बीआयटी) येथे संकुल संचालक ऋतुराज शिवाजीराव सावंत यांच्या दिशादर्शक मार्गदर्शनाखाली व प्राचार्य डॉ.एच.व्ही.शेटे सर यांच्या नेतृत्वाखाली डिप्लोमा मधील विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसाठी ‘पालक मेळाव्या’चे आयोजन करण्यात आले होते. याला विद्यार्थी व पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एच. व्ही. शेटे व पालक प्रतिनिधी म्हणून प्रा.महानंदा निकम यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपल्या प्रास्ताविकामध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमाचे विभागप्रमुख प्रा.सरवदे सर यांनी कार्यक्रम घेण्यामागील उद्देश्य, कार्यक्रमाची रूपरेषा याबाबत माहिती सांगितली. तर प्राचार्य डॉ. एच. व्ही. शेटे यांनी महाविद्यालयात उपलब्ध सोयी सुविधा, सुसज्ज ग्रंथालय, रात्र अभ्यासिका वर्ग, तसेच शिक्षणासाठी संबंधित महत्वाच्या बाबी सांगितल्या. प्ले ग्राउंड, जिमखाना,वसतिगृहातील सुविधा, वाहतुकीसाठी बस सुविधा, वाय-फाय इंटरनेट सुविधा, फीडबॅक सिस्टम तसेच इंडस्ट्रीयल व्हिजीट आदी निगडीत आवश्यक सुविधांची सविस्तर माहिती दिली. यावेळी प्रा.स्नेहा पोतदार व प्रा. प्राजक्ता मोहिते मॅडम यांनी पीपीटीद्वारे इन्स्टिटयूट प्रेझेंटेशन दिले.यावेळी बोलताना पालकांनी बीआयटीमधील आदरयुक्त शिस्तीमुळे संस्कारक्षम विद्यार्थी घडतो त्याला अभ्यासाची सवय जडते परिणामी विद्यार्थी हा बाहेरील जगात स्पर्धा करण्यासाठी सज्ज होतो.एकूणच बीआयटीच्या माध्यमातून पालकांपर्यंत अखंड धागा जोडला गेलेला आहे. तसेच मुलींच्या शिक्षणासाठी, त्यांच्या सुरक्षेसाठी आणि कॉलेज कडून होणाऱ्या संवादाचे कौतुक आणि समाधान व्यक्त केले तसेच येथील परिसर ,भौतिक सोयी सुविधा इत्यादींचे कौतुक करत समाधान व्यक्त केले. यावेळी पालकांनी विविध विषयावर प्रश्न मांडले त्यामधील काहीची उत्तरे जागेवरच दिली. तर काही प्रश्न वरिष्ठ पातळीवर सोडविण्याचे आश्वासन दिले. या कर्यक्रमाला 160 पेक्षा जास्त पालकांची उपस्थिती होती हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रा.स्वप्नील कुरमुडे, प्रा.अक्षय कोरे,प्रा.रोहन मोटे, प्रा. वैभव जगताप,प्रा.रुपाली माने, प्रा.अक्षता शिंदे,ऋतुजा यादव, इत्यादींनी परिश्रम घेतले,सूत्रसंचालन प्रा.मोनिका होळे यांनी केले तर आभार प्रा. किर्ती जाधव यांनी मानले.
