भुम (प्रतिनिधी)-  दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या दांपत्याच्या दुचाकीला पाठीमागून अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्यामुळे वाहनावरील पत्नीचा जागीच मृत्यू झाला. तर पती गंभीर जखमी झाल्याची घटना दिनांक 25 फेब्रुवारी रोजी रात्री सव्वादहा वाजण्याच्या सुमारास सोलापूर - धुळे राष्ट्रीय महामार्गावरील कन्हेरी फाटा येथे घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार वाशी येथील रहिवासी समाधान भगवान पुणेकर वय 45 वर्षे हे त्यांची पत्नी मनीषा समाधान पुणेकर यांचे सह त्यांची दुचाकी क्रमांक एम एच 25 जे 6651 वरून धाराशिव येथून वाशी येथे येत असताना रात्री सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास सोलापूर - धुळे राष्ट्रीय महामार्गावरील कन्हेरी  फाटा येथून वाशीकडे वळत असताना समोरून वाहने येत असल्यामुळे ते रोडच्या बाजूला थांबले होते. याच वेळी पाठीमागून भरधाव वेगात येणाऱ्या मालवाहू ट्रकने दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली. यामध्ये दुचाकी वरील मनीषा समाधान पुणेकर वय 40 वर्ष यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाता वेळी मालवाहू ट्रकने मनीषा पुणेकर यांना जवळपास 50 फूट अंतरापर्यंत फरपटत नेले. तर यावेळी समाधान पुणेकर यांच्या डोक्याला गंभीर मार लागला असून दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले आहेत.  उपचारासाठी त्यांना वाशी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता त्याचेंवर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी धाराशिवच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.

 
Top