भूम (प्रतिनिधी)-  ओंकार चौक ते न.प. चौक या ठिकाणी भाजीपाला विक्रेत्यांना हटवून उपलब्ध मार्केटमध्ये जाण्यास भागा पाडावेे, असी मागणी रिपब्लिकन सेनेचे भूम तालुका सचिव सुभाष जावळे व समाजसेवक नारायण बाराते यांनी नगरपरिषदेला निवेदन देऊन केली आहे.

भूम परंडा रोड व नागोबा चौक ते ओंकार चौक या चौकामध्ये रहदारीचा रस्ता आहे या ठिकाणी तहसील ऑफिस पंचायत समिती ऑफिस पोलीस स्टेशन नगरपरिषद तसेच रवींद्र शाळा, गुरुदेव शाळा अशा रहदारीच्या ठिकाणी भाजी विक्रेते बसत आहेत. यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांचा वावर जास्त आहे. या रोड वरून वाहतूक जास्त प्रमाणात आहे. याच रोडवर भाजीपाला विक्रेते सकाळी सात वाजल्यापासून त्या संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत रस्त्याच्या कडेला आपले दुकाने थाटून बसलेली असतात. पर्यायाने शाळेतील विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करून विद्यार्थी रोडच्या कडेने न जाता भाजीविक्रेते बसल्यामुळे विद्यार्थी रोडच्या मधून जात असून त्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. 

गोलाई चौकामध्ये एखाद्या गाडीचे जर ब्रेक फेल झाल्यावर भाजीपाल्या विकणारा व भाजपाला घेणारा या दोघांच्या जीवितास धोका होण्याची संभावना आहे. तरी सर्व भूम शहरातील भाजीपाला विकणाऱ्या भूमच्या उपलब्ध भाजीपाला मार्केटमध्ये बसावे. असे निवेदनात म्हटले आहे. जर निवेदनाचा संबंधितांनी विचार केला नाही तर रिपब्लिकन सेनेच्या भूम तालुक्याच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.


 
Top