भूम  (प्रतिनिधी)- येथे श्री संत भगवान बाबा यांची 61 वी पुण्यतिथी प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. रविवार दिनांक एक रोजी भूम शहरामध्ये तालुक्यातील वंजारी समाज बांधवांच्या वतीने श्री संत भगवान बाबा यांची पुण्यतिथी विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली. यावेळी विजयनगर येथे श्री संत भगवान बाबा यांच्या प्रतिमेचे समाजातील ज्यष्ठ नागरिकांच्या व महिलांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. त्यानंतर भूम ते अहिल्यानगर रोड, गोलाई चौक, ओंकार चौक, नगरपालिका, गांधी चौक, बागवान गल्ली , बाजारतळ या शहरातील प्रमुख मार्गावरून श्री संत भगवान बाबा यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक वाजत गाजत व फटाक्यांच्या आतिषबाजीत साधेपणाने काढण्यात आली. यावेळी ठिकठिकाणी लेझीम पथक, तसेच टाळ मृदंगाच्या पथकाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी महिलांनी व पुरुष आणि महिलांनी खेळलेल्या फुगडीने देखील सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. या मिरवणुकीची सांगता विजयनगर येथे करण्यात आली. या मिरवणुकीमध्ये महिलांची देखील लक्षणीय उपस्थिती होती. मिरवणुकीची सांगता झाल्यानंतर महाआरती झाली. या महाआरतीनंतर समाज बांधवांसह सर्व उपस्थित त्यांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. पुण्यतिथी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भूम तालुक्यातील समाज बांधवांनी परिश्रम घेतले.


Next
This is the most recent post.
Previous
Older Post
 
Top