धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, उस्मानाबाद तसेच जिल्ह्यातील सर्व तालुका विधी सेवा समिती यांच्या स्तरावर “पॅनेल विधिज्ञ” या पदाकरिता काम करण्यास इच्छुक असलेल्या विधिज्ञांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.23 फेब्रुवारी 2026 पर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत.
धाराशिव तालुका कार्यक्षेत्रातील विधिज्ञांनी आपले अर्ज जिल्हा विधी सेवा प्राधिकरण,उस्मानाबाद येथे सादर करावेत.तसेच उमरगा,भूम, परंडा,तुळजापूर,कळंब,वाशी आणि लोहारा या तालुक्यांतील इच्छुक विधिज्ञांनी संबंधित तालुका विधी सेवा समितीच्या न्यायालय परिसरातील कार्यालयात अर्ज सादर करावेत.अर्ज 23 फेब्रुवारी 2026 पर्यंत किंवा त्यापूर्वी (सुट्टीचे दिवस वगळून) सादर करणे आवश्यक आहे.निर्धारित मुदतीनंतर प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत,याची सर्व विधिज्ञांनी नोंद घ्यावी.
सदर माहिती जिल्हा न्यायालय, उस्मानाबाद यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.तरी इच्छुक विधिज्ञांनी या संधीचा लाभ घ्यावा व निर्धारित मुदतीत जिल्हा विधी सेवा प्राधिकरण,उस्मानाबाद तसेच संबंधित तालुका विधी सेवा समिती येथे अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.