मुरुम (प्रतिनिधी)- माती परीक्षण ही काळाची गरज असून शेतकऱ्यांना खर्च कमी करून उत्पादन वाढविण्यासाठी फायद्याचे आहे. यातून योग्य खताचा वापर करून सकस धान्य निर्मितीस चालना मिळेल. असे प्रतिपादन  डॉ सतीश गावित यांनी केले. ते श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या व्हांतळ येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबिरातील दिनांक 24 फेब्रुवारी रोजी  बौद्धिक  सत्राच्या अध्यक्षीय समारोपात बोलत होते. याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून भूगोल विभाग प्रमुख डॉ धनराज इटले उपस्थित होते. त्यांनी माती परिक्षणासाठी मातीचा नमुना आणण्याची पद्धत सांगून शेतकऱ्यांना मोफत परिक्षणासाठी माती आणण्याचे आव्हान केले. यावेळी डॉ सूर्यकांत राठोड यांनी वक्त्यांचा परिचय करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वंयसेवक सुशील सूर्यवंशी याने तर आभार अर्जुन जाधव याने मानले. याप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. बी. ए. शेळके, डॉ. अनिल देशमुख, डॉ चंद्रसेन करे, डॉ समाधान पसरकळले, डॉ विठ्ठल ढोले, डॉ अतुल बिराजदार, शिबिरार्थी स्वयंसेवक, शेतकरी ग्रामस्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top