धाराशिव (प्रतिनिधी)--मराठा समाजातील उद्योजकांना जागतिक स्तरावरील व्यावसायिक संधी उपलब्ध करून देणाऱ्या मराठा आंत्रप्रेन्युअर असोसिएशन (MEA) च्या वतीने पुण्यात २७ व २८ फेब्रुवारी२०२६ व १ मार्च २०२६ महिन्यात MEA इंटरनॅशनल बिझनेस एक्स्पो २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे.या पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्ह्यातील मराठा व्यावसायिक तसेच उद्योजकांसाठी भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून, हा मेळावा शनिवार, १० जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता धाराशिव शहरातील परिमल मंगल कार्यालयात होणार आहे.
२०२६ च्या पार्श्वभूमीवर MEA च्या श्री विक्रम गायकवाड, अध्यक्ष MEA, श्री उमेश सोकांडे, श्री विक्रम नरसाळे टीमने जिल्हा धाराशिव येथे मराठा समाजातील उद्योजकांना एकत्र आणणारा उपक्रम हाती घेतला असून, यावेळी MEA चा विस्तार, आगामी आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाची माहिती तसेच व्यवसायवृद्धीसाठी उपलब्ध संधींवर चर्चा होणार आहे.
मेळाव्यासाठी एन साई साखर कारखान्याचे अध्यक्ष बी.बी. ठोंबरे,दिगंबर मडके,ॲड. चित्राव गोरे तसेच प्रदीप मुंडे यांची सन्माननीय उपस्थिती असणार आहे. या मेळाव्यात जिल्ह्यातील मराठा उद्योजकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले असून, या उपक्रमामुळे मराठा समाजातील उद्योजकांसाठी नव्या व्यावसायिक संधींचे दालन खुले होईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.