तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथील रोहन सोमनाथ कोळी हे जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी संभाजीनगर येथील उपसंचालक तथा सचिव अनुसूचित जमाती कार्यालयासमोर 25 जानेवारीला उपोषणाला बसणार आहेत.

तेर येथील रोहन सोमनाथ कोळी यांनी 18 डिसेंबर 2024 ला संभाजीनगर येथील उपसंचालक तथा सचिव अनुसूचित जमाती कार्यालयाला जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज सादर केला.त्यानंतर गृ ह चौकशी होऊनही तीन वेळेस पत्रव्यवहार करूनही अहवाल प्राप्त झाला नाही.जात वैधता प्रमाणपत्र देण्यात यावे नसता 25 जानेवारी 2026 रोजी संभाजीनगर येथील उपसंचालक तथा सचिव अनुसूचित जमाती कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार असल्याचे निवेदन संबंधित कार्यालयाला देण्यात आले आहे.निवेदनाच्या प्रति मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,पुणे येथील आदिवासी विकास संशोधन कार्यालयाला पाठविल्या आहेत.

 
Top