परंडा (प्रतिनिधी)- आज मराठी पत्रकार दिनानिमित्त परंडा तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांचा भाजपा नेते माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी संपर्क कार्यालय, परंडा येथे सत्कार करुन मराठी पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी भाजपा तालुकाध्यक्ष अरविंदबप्पा रगडे, जिल्हा उपाध्यक्ष ॲड.संतोष सुर्यवंशी, माजी नगराध्यक्ष नगरसेवक रमेशसिंह परदेशी, अल्पसंख्याक मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष ॲड जहीर चौधरी, तालुका सरचिटणीस तानाजी पाटील, निशिकांत क्षिरसागर, युवा मोर्चा शहराध्यक्ष नगरसेवक अविनाश विधाते, युवा नेते नगरसेवक समरजीतसिंह ठाकूर, नगरसेवक अकिब पठाण आदीसह उपस्थित होते.
