धाराशिव (प्रतिनिधी)- दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती तथा पत्रकार दिनानिमित्त येरमाळा पत्रकार संघाच्या वतीने घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेचे बक्षीस वितरण सोहळा, तानुबाई बिर्जे विशेष महिला पत्रकार पुरस्काराने धाराशिव येथील तीस वर्षे पत्रकारीता केलेल्या शिला उंबरे यांचा सन्मान करण्यात आला.
येरमाळा पत्रकार बहुउद्देशीय सामाजिक संस्था संचालित येरमाळा पत्रकार वतीने दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त येथील शाळेमध्ये घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेचे बक्षीस वितरण, आशा कार्यकर्ती व अंगणवाडी सेविका आणि मदतनीस सन्मान सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी रत्नदीप बारकुल निरीक्षक वैद्यमापन शास्त्र (राजपत्रित), वैभव कवडे राज्यकर निरीक्षक अधिकारी, जयदेवी कांबळे पुरवठा निरीक्षक तहसील कार्यालय कळंब, महिला ज्येष्ठ पत्रकार शीला उंबरे, माजी सभापती विकास बारकुल यांची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमासाठी सरपंच प्रिया बारकुल,वैद्यकीय अधिकारी डॉ.सुधाकर बिराजदार, सहायक पोलीस निरीक्षक तात्याराव भालेराव, डॉ.पल्लवी तांबारे, सचिन पाटील, प्राचार्य सुनील पाटील, सतोष तौर, पापा पायाळे यांच्यासह विद्यार्थी, शिक्षक, पत्रकार, आशा कार्यकर्ती व अंगणवाडी सेविका आणि मदतनीस, ग्रामस्थ उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक दत्ता बारकुल यांनी केले. तर सूत्रसंचलन प्रा.महादेव गपाट यांनी केले. तर आभार सचिन बारकुल यांनी मानले.
