तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजाभवानी महाविद्यालय तुळजापूर येथे श्री स्वामी विवेकानंद सप्ताह मध्ये जागर :आधुनिक शिक्षण आणि तात्रंतनाचा या व्याख्यानमाला अंतर्गत आज “उद्योगातील नवीन संधी आणि शासकीय योजना”या विषयावर मुख्य व्याख्याते मा. दत्ता दिनकर चव्हाण (सहाय्यक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता केंद्र, धाराशिव) यांचे मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन केले होते.
कार्यक्रमाची सुरुवात स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. जीवन पवार (प्राचार्य, तुळजाभवानी महाविद्यालय, तुळजापूर) हे होते.
या वेळी प्रमुख व्याख्याते यांनी “उद्योगातील नवीन संधी आणि शासकीय योजना”याविषयी सविस्तर माहिती युवकांना दिली.विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून कौशल्य विकासावर भर द्यावा, तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ घेऊन स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण कराव्यात, असे त्यांनी प्रतिपादन केले.आजच्या काळात शिक्षणासोबत कौशल्य, नवकल्पना आणि उद्योजकता यांचा समन्वय आवश्यक आहे. शासकीय योजनांचा योग्य वापर करून युवकांनी स्वतःचा उद्योग सुरू केल्यास स्वयंरोजगारासोबत इतरांसाठीही रोजगारनिर्मिती शक्य आहे. स्वामी विवेकानंद यांच्या आत्मनिर्भरतेच्या विचारांप्रमाणे तरुणांनी ध्येय निश्चित करून उद्योग क्षेत्रात पुढे यावे, ही काळाची गरज आहे.
मा.सुमित सुरवसे सहाय्यक, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता केंद्र, धाराशिव) यांनी कौशल्य विकास योजना प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना महाराष्ट्र कौशल्य विकास अभियान याअंतर्गत मोफत किंवा अल्पदरात कौशल्य प्रशिक्षण दिले जाते. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम महाराष्ट्र शासनाची योजना असून उद्योग सुरू करण्यासाठी अनुदान व कर्ज सुविधा दिली जाते. महिला उद्योजकांसाठी योजना,महिला आर्थिक विकास, महामंडळ योजना, स्टँड-अप इंडिया, स्वयं-सहायता गटांना आर्थिक मदत शासन करते. तसेच शासकीय योजना व वास्तववादी उदाहरणांच्या सहाय्याने तरुणांना उपलब्ध संधी आणि योजना याची माहिती दिली. अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. जीवन पवार यांनी विद्यार्थांनी सरकारी नोकरीच्या पाठीमागे न लागता आपली कौशल्य विकसित करून स्वतः व्यवसाय सुरू करावा. विद्यार्थ्यांनी स्वतः उद्योजक म्हणून तयार व्हावे यासाठी शासनाने कौशल्यावर आधारित राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अमलात आणले. यशस्वी उद्योजकीय प्रवासाचा अनुभव विद्यार्थ्यांसमोर मांडत, कठोर परिश्रम, सातत्य आणि नवकल्पना यांचे महत्त्व अधोरेखित केले.आजच्या युगात तंत्रज्ञान, डिजिटलायझेशन आणि जागतिकीकरणामुळे उद्योग क्षेत्रात अनेक नवीन संधी निर्माण झाल्या आहेत. पारंपरिक नोकरीपेक्षा स्वयंरोजगार व स्टार्टअप संस्कृती झपाट्याने वाढत आहे. असे प्रतिपादन केले.
सदर कार्यक्रमास प्रा.डॉ.बापुराव पवार, डॉ .मंत्री आडे ,डॉ . बालाजी कऱ्हाडे, डॉ . स्वाती बैनवाड, प्रा.निलेश एकदंते, प्रा.सुदर्शन गुरव , प्रा .राणूबाई कोरे ,डॉ .शिवकन्या निपाणीकर , कनिष्ठ विभाग प्रमुख प्रा.अनिल नवरे, प्रा.कदम मॅडम प्रा जे.बी. क्षीरसागर उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शिवाजी जगताप, यांनी केले .आभार प्रदर्शन प्रा. अभिमन्यू कळसे यांनी व्यक्त केले .यावेळी महाविद्यालयातील सर्व गुरुदेव कार्यकर्ते शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
