मुरुम (प्रतिनिधी)- श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय उमरगा येथील वाणिज्य विभाग वाणिज्य मंडळ क्वालिटी सर्कल आणि महाविद्यालयाच्या करिअर कट्ट्याच्या वतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त युवा सप्ताह साजरा करताना युवक आणि युवतींसाठी विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संजय अस्वले यांनी केले. मुलांनी स्वामी विवेकानंदांचे आदर्श संस्कार, मूल्य-संस्कृती आचरणात आणली तरच  मुलींनी राजमाता जिजाऊ चे आदर्श घेऊन आपले संस्कार मूल्य संस्कृती जपावी तरच भावी आदर्श पिढी घडेल. श्रद्धा ठेवावी पण अंधश्रद्धा ठेऊ नये. असे प्रतिपादन डॉ अस्वले यांनी उद्घाटन पर मार्गदर्शनात केले.

दिनांक 12 जानेवारी ते 13 जानेवारी 2025 असे दोन दिवसीय उपक्रमात रांगोळी स्पर्धा, निबंध, वक्तृत्व आणि पोस्टर स्पर्धा, वेषभूषा स्पर्धा आणि समुपदेशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

प्रथम राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांना अभिवादन करण्यात आले. त्यानंतर आयोजित रांगोळी स्पर्धेमध्ये 16 विद्यार्थ्यानी, पोस्टर स्पर्धेमध्ये 11 तर पारंपरिक वेशभूषा स्पर्धेमध्ये 22 आणि निबंध स्पर्धेमध्ये 28 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. या कार्यक्रमाचे अध्यक्ष  वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. डॉ. अजित अष्टे सर, प्रमुख पाहुणे म्हणून करिअर कट्ट्याचे समन्वयक प्रा. डॉ. पसरकले सर आणि प्रा. डॉ. करे सर, वाणिज्य विभागातील सर्व प्राध्यापक उपस्थित होते. 

यावेळी स्त्री सशक्तीकरण आणि  युवा जनजागृती  या विषयावर कुमारी सानिका जाधव, सना चौधरी, इंगळे प्रियांका, लक्ष्मी हिरमुखे, निकिता चांदोरे, प्रतिभा यादव, गणेश मोरे, प्रसाद मम्माले, सुरवसे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.    तर विद्यार्थ्यांनी आपले लक्ष्य साध्य करण्यासाठी महापुरुषांचे विचार समोर ठेवून कार्य करावे असे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्षीय समारोप करतेवेळी डॉ अजित अष्टे यांनी केले. यावेळी करिअर कट्टा विद्यार्थी संसद पदाधिकारी यानी बारामती येथील अधिवेशनातील अनुभव आणि उपक्रमाची माहिती दिली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरज सूर्यवंशी यांनी केले तर आभार सौरभ पाटील यांनी मानले. परीक्षक म्हणून डॉ. श्रीशैल तोडकर प्रा. सूरज सूर्यवंशी यांनी काम पाहिले.तर कार्यक्रमासाठी डॉ. खंडू मुरळीकर डॉ. विजय मुळे ओमप्रकाश पवार, प्रा. अक्षता बिराजदार, प्रा. संध्या चौगुले, प्रा .विद्या गायकवाड आणि वाणिज्य मंडळ कल्चरल क्वालिटी सर्कल चे सदस्य आणि करिअर कट्टा चे पदाधिकारी आदी उपस्थित होते.

 
Top