परंडा  (प्रतिनिधी)- परंडा नगर परिषदेच्या पहिल्याच विशेष सभेमध्ये शिवसेना शिंदे गटाचे नगराध्यक्ष जाकीर सौदागार यांच्या अध्यक्षतेखाली बुधवार दि.14 रोजी बैठक घेण्यात आली यात उपनगराध्यक्ष व रिक्त असलेल्या स्विकृत सदस्य यांची निवड करण्यात आले. उपनराध्यक्षपदी जनशक्ती नगर विकास आघाडीचे समरजितसिंह सुजितसिंह ठाकूर, तर स्विकृत सदस्यपदी ईसमाइल कुरेशी, सेनेचे वाजीद दखनी यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

प्रशासकीय पारदर्शकता साठी या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत पठासीन अधिकारी म्हणून नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांनी काम पाहिले तर मुख्याधिकारी मनिषा वडेपल्ली यांनी निवडणूक प्रकियेत साहय्यक म्हणून होत्या.निवडणूकीत उपनगराध्यक्ष पदासाठी जनशक्ती आघाडी कडून समरजितसिंह ठाकूर व सेनेचे मन्नाबी जिनेरी यांनी अर्ज दाखल केले होते.यात आघाडीचे समरजितसिंह ठाकूर यांना 12 मते पडले तर सेनेचे मन्नाबी जिनेरी यांना 9 मते पडल्याने अधिक 3 मताने समरजितसिंह ठाकूर यांनी विजय मिळवला तर स्विकृत सदस्य पदासाठी सुरुवातीला तीन अर्ज दाखल करण्यात आले होते.जनशक्ती नगरविकास आघाडी कडून ईसमाइल कुरेशी तर शिवसेना शिंदे गटाकडून वाजीद दखनी व मसरत काझी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता मसरत काझी यांनी  ऐनवेळी आपला उमेदवारी अर्ज मागे  घेतल्याने सेनेचे वाजीद दखनी यांची निवड झाल्याचे घोषीत करण्यात आले.

जनशक्ती आघाडीचे समरजितसिंह ठाकूर व ईसमाइल कुरेशी यांची निवड होताच कार्यकर्त्यांनी जल्लोष करत गुलाल उधळून फटाक्यांच्य अतषबाजी करून शहरातून मिरवणूक काडण्यात आली यावेळी उपनगराध्यक्ष समरजिसिंह ठाकूर व स्विकृत सदस्य ईस्माइल कुरेशी यांचा सत्कार भाजपा नेते माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी सत्कार केला.  यावेळी उबाठाचे जिल्हा प्रमुख रणजितसिंह पाटील, माजी नगराध्यक्ष सुभाषसिंह सद्दीवाल तसेचआजी माजी नगरसेकसह आघाडीचे पदाधिकारी कायकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top