तुळजापूर (प्रतिनिधी)-  भारतीय संस्कृती समजून घेण्यासाठी आजच्या तरुणांनी स्वामी विवेकानंद यांचे चरित्र वाचावे आवश्यक आहे. असे प्रतिपादन प्रा. डॉ.विनोदकुमार वायचळ यांनी केले. येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित तुळजाभवानी महाविद्यालय तुळजापूर या महाविद्यालयांमध्ये विवेकानंद सप्ताह अंतर्गत ते “स्वामी विवेकानंद आणि आजचा युवक” यावर बोलत होते. 

पुढे डॉ. वायचळ म्हणाले की, स्वामी विवेकानंदांच्या विचारांमध्ये सकारात्मकता, सहजता, जाणवते. त्यांच्या जन्मापासून ते जीवनाच्या अंतिम टप्प्यापर्यंत त्यांचे कार्य वेद अभ्यास, अध्यात्म, हिंदू धर्मातील  सकारात्मकता यांचा प्रसार आणि प्रचार करण्यामध्ये स्वामी विवेकानंद यांचे महत्त्वपूर्ण योगदान होते. स्वामी विवेकानंद यांच्या स्वप्नातील युवक या विषयावर बोलताना त्यांनी स्वामी विवेकानंद यांना अपेक्षित असणारा भारतीय युवक या विषयी सांगताना त्यांनी श्रीमद्‌‍ भगवद्गीता, वेद, उपनिषदे, त्यातील अध्याय श्लोक यासह उदाहरणे देऊन त्यांनी सांगितले. की कोणत्याही मार्गाने कोणत्याही धर्मातील देवांची भक्ती, सेवा केली तरी शेवटी प्राप्त होणारा परमात्मा हा एकच असतो.  प्रमुख उपस्थिती म्हणून मसला खुर्द येथील युवा उद्योजक रामेश्वर खराडे, डॉ. श्रीराम नरवडे यांचेही मार्गदर्शन झाले.

अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ.जीवन पवार यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांनी स्वामी विवेकानंदांचे विचार आत्मसात करून जीवनात आत्मविश्वास, शिस्त व सामाजिक बांधिलकी जोपासावी. स्वामी विवेकानंदांच्या विचारांचे आजच्या तरुण पिढीसाठी असलेले महत्त्व विशद केले. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. अनिल नवात्रे यांनी केले. तर सूत्रसंचालन प्रा. ज्योतिर्लिंग क्षीरसागर यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. शिवाजी जगताप यांनी मानले. सदर कार्यक्रमास विवेकानंद सप्ताहाचे संयोजक आणि सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. डॉ. मंत्री आडे, डॉ. बापुराव पवार, डॉ. नेताजी काळे, प्रा. बालाजी कऱ्हाडे, प्रा. स्वाती बैनवाड, ग्रंथपाल डॉ. दीपक निकाळजे, प्रा. गोकुळ बाविस्कर, प्रा. निलेश एकदंते, प्रा. सुदर्शन गुरव, प्रा. बाळू कुकडे, प्रा. राणुबाई कोरे, डॉ. तांबोळी मॅडम प्रा. सतीश वागतकर, प्रा. अनिल नवात्रे, प्रा. शिवाजी जगताप, तसेच महाविद्यालयातील सर्व गुरुदेव कार्यकर्ते आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top