मुरुम (प्रतिनिधी)-  श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय उमरगा येथील एनसीसी विभागातील कॅडेट अर्जुन पाचंगे ची दिल्ली येथे  होणाऱ्या 26 जानेवारी 2026 दिनी होणाऱ्या प्रजासताक संचलन परेडसाठी दिल्ली येथील राजपथावर होणाऱ्या संबळ या कला प्रकारामध्ये त्याची महाराष्ट्राच्या मुलाच्या संघात निवड झाली आहे. मागच्या वर्षी सुद्धा 26 जानेवारी 2025 मध्ये महाविद्यालयातील कॅडेट वैभवी शेंडगेनी ड्रिल मधुन महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले होते. या वर्षी सुद्धा अर्जुन पाचंगे हा सलग दिल्ली येथे परेडसाठी जाणारा दुसरा कॅडेटचा बहुमान मिळून एनसीसी विभागाचा इतिहास रचला आहे.

आज पर्यंत लातूर बटालियन मधुन सलग दोन वर्ष दिल्ली परेडसाठी कोणत्याच महाविद्यालयाला हे यश प्राप्त झाले नाही. परंतु श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयातील एनसीसी विभागाने हे सिद्ध करून दाखविले आहे.दिल्ली येथे प्रत्येक वर्षी होणाऱ्या या संचलनासाठी देशातुन सर्व राज्य व केंद्रशासित प्रदेशातुन एकुण 17 निदेशालयातुन एनसीसी कॅडेटस ड्रिल, सांस्कृतिक,बेस्ट कॅडेट,गार्ड ऑफ ऑनर,लाईन एरिया अशा विविध प्रकारा मधुन विभिन्न सांस्कृतिक,परंपरा, वेशभुषाचे प्रदर्शन या कार्यक्रमात सहभागी होऊन आपल्या राज्याचे नेतृत्व करत असतात.26 जानेवारी दिल्ली येथे होणाऱ्या गणतंत्र दिवस शिबीरासाठी अनेक कठिन चाचण्या,परीक्षा पूर्ण करून ते कॅडेटस इथपर्यंत पोहचतात. 


प्रत्येक कॅडेटसचे एनसीसी मध्ये प्रवेश घेतल्या नंतर सर्वात मोठे ध्येय ,उदिष्ट,स्वप्न याच शिबीराचे असते. रांत्रदिवस एक करून हे कॅडेटस कँपची तयारी करत असतात.हे शिबीर कॅडेटसचे भवितव्य ठरवणारे असते.मौजे हिप्परगा ता.उमरगा जि.धाराशिव येथील छोट्याशा गावातुन कठिन अशा परिस्थितीताला सामोरे जाऊन सर्वसाधारण गरीब कुटुंबात जन्म घेतलेला वडिल दुसऱ्याच्या गाडीवर ड्रायव्हर म्हणुन काम करतात. अर्जुने स्वतःच्या जिद्द,आत्मविश्वास,कठोर परिश्रमातुन हे यश पूर्ण करून दाखविले आहे.वंश परंपरागत घरामध्ये लोकगीत,लोकसंगीत गोंधळ, वाघ्या - मुरळी अशा कार्यक्रमातुन वडिल,मोठा भाऊ व स्वतः अर्जुन घर चालवतात खंडोबा,आई तुळजा भवानीचे संबळ वाजवुन पुजा व नामस्मरण करतात तसेच आज सुद्धा गावोगावी खंडोबा,देवीचे गोंधळ करून नविन गृहप्रवेश,नवदांपत्यास आशीर्वाद मिळावे यासाठी गोंधळ ,वाघ्या-मुरळी म्हणून या कार्यक्रमातुन त्याचे देवी - देवताचे स्त्वन - नवस करत असतात.याच कार्यक्रमा मध्ये संबळ वाद्य मोलाची भूमिका बजावतो व यावर्षी याच वाद्या मधुन आज त्याची महाराष्ट्राच्या संघातुन त्याची निवड झालेली आहे . एक्किवीसव्या शतका मध्ये आपण जरी नविन पाश्चात्य गीत, गायन , वाद्य या संस्कृतीला स्विकारत असलो  तरी कुठे तरी त्याचे संरक्षण अशा व्यासपिठाचा माध्यमातून होत असते.वर्तमानात आज घडीला जुन्या,प्राचीन वाद्य, संगीत कला प्रकार लोप पावत आहेत परंतु अर्जुन ने दाखवुन दिले की ही कला , वाद्य किती महान आहेत . महाराष्ट्राची  पारंपारिक,ऐतिहासिक हे वादय तो देशाच्या पटलावर तो संबळ या वादयाच्या माध्यमातून त्याचा ठसा त्यांनी उमटवला आहे .महाराष्ट्राच्या प्राचीन परंपरेचे लोककला , लोकसंगीताचे जतन,संरक्षण, तो करत आहे. या यशबदल त्याचे सर्व स्तरातुन त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव संपुर्ण धाराशिव जिल्हयातून,उमरगा तालुक्यातुन होत आहे.तसेच वाईपी म्हणजेच युथ एक्सचेंज प्रोग्राम या मध्ये सुद्धा त्याची संबळ वादयातुन भारताच्या संघात त्याची निवड झाली आहे.अर्जुनला 53 महाराष्ट्र एनसीसी बरालियन लातूरचे कमान अधिकारी कर्नल संतोष नवगन,ॲडम ऑफिसर कर्नल वाय बी सिंग,सुभेदार मेजर शंभु सिंग त्यांच्या सर्व सैन्यदलातील संघ, कार्यालयीन कर्मचारी व कॅप्टन डॉ ज्ञानेश्वर चिट्टमपल्ले यांनी अर्जुन कडुन खुप मेहनत करून घेतली व त्याला मार्गदर्शन केले.या यशा बदल भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.अमोल मोरे, उपाध्यक्ष अश्लेष मोरे,सर्व संस्थेचे संचालक मंडळातील सदस्यांनी त्याचे कौतुक व अभिनंदन केले.तसेच या शिबीरात सहभागी झाल्या बदल प्राचार्य डॉ संजय अस्वले,उप्राचार्य डॉ विलास इंगळे,डॉ पदमाकर पिटले,प्रा गुंडाबापु मोरे,शैलेश महामुनी,श्री नितीन कोराळे, राजकुमार सोनवणे सर्व प्राध्यापक,प्राध्यापिका कॅडेटस,विद्यार्थी,शिक्षेकेत्तर कर्मचारी यांच्या वतीने त्याच्या उत्तुंग यशिस्वेतेसाठी शुभेच्छा दिल्या .

 
Top