धाराशिव (प्रतिनिधी)- प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी आदर्श परिवाराच्या वतीने मकर संक्रांती महोत्सवा अंतर्गत हळदी कुंकू सोहळ्याचे औचित्य साधत भव्य होम मिनीस्टर स्पर्धेचे आयोजन संस्थेचे सरचिटणीस प्रेमाताई सुधीर पाटील यांच्या नेतृत्वाखाली व डॉ. मंजुळाताई आदित्य पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीपतराव भोसले हायस्कूलच्या भव्य मैदानावर आदर्श गाव निर्मित नगरीत संपन्न झाली.
प्रसिद्ध निवेदक तथा सादरीकरण करणारे बळवंत जोशी यांच्या जबरदस्त अशा आगळ्यावेगळ्या शैलीत या स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेतील पहिले बक्षीस पैठणी ही वर्षा प्रविण मुळे विजेते यांना प्राप्त झाले. तर दुसरे बक्षीस प्रज्ञा चंदनशिवे कुकींग सेट हा यांना मिळाला. तर तिसरे बक्षीस मिक्सर हे वैष्णवी योगेश सोनसाळे यांना मिळाले. तर एकूण 18 आकर्षक बक्षीस भेट वस्तू मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमांतर्गत आदर्श माता पुरस्कार 2026 अंतर्गत शालन सत्यवान दारफळकर, सुनिता सूर्यकांत पाटील, सोनाली नितीन पडवळ यांना संस्थेच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. तसेच या स्पर्धेत 125 माहिलांनी सहभाग नोंदवला.
या कार्यक्रमाचे वैशिष्ठ म्हणजे पारंपारिक गाव देखाव्याची रचना केली होती. हजारो महिलांनी या कार्यक्रमाला हजेरीसह छायाचित्र घेण्याचा आनंद लुटला. या सर्व महिलांना आदर्श परिवाराच्या वतीने सन 2026 ची दिनदर्शिका व गूळ पावडरचे पॅकेट भेट म्हणून देण्यात आले. तर शेकडो महिलांनी होम मिनीस्टर स्पर्धेत उत्स्फूर्त भाग नोंदविला. तर त्यांनी बक्षीस पटकावली. कार्यक्रमात बहारदार गीताचे गायन संगीतशिक्षक महेश पाटील यांनी सादर केले तर सुत्रसंचलन डॉ. दत्तात्रय जाधव यांनी केले .
कार्यक्रम यशस्वतीते साठी यांची पर्यवेक्षिका भारती गुंड, शिक्षिका अर्चना देशमुख,संगिता शिंदे व सर्व माहिला शिक्षिकावृंद कलाशिक्षक शिवाजी भोसले, कलाध्यापक शेषनाथ वाघ, सुरज सपाटे, स्वप्निल पाटील, सेवक नायक सुहास काटे, सेवक उमेश पाटील, आबा घोडके सर्व सेवक वृंद यांनी परिश्रम घेतले.
