धाराशिव (प्रतिनिधी)- अल्पावधीतच विश्वासार्हता आणि कार्यक्षमतेच्या जोरावर नावारूपास आलेल्या नारायणी महिला जिल्हा सहकारी पतसंस्था मर्या., धाराशिव यांच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन गुरुवारी (दि. 8) सायंकाळी 6 वाजता संस्थेच्या मुख्य कार्यालयात, काळा मारुती चौक, मारवाडी गल्ली, धाराशिव येथे पार पडले. हा कार्यक्रम नामांकित मॉडेला टेलर्सचे मालक, संस्थेचे मार्गदर्शक तथा शांत संयमी व्यक्तिमत्त्व सय्यद सरशाद अब्दुल हलिम रझवी यांच्या शुभहस्ते छोटेखानी स्वरूपात पार पडला.

यावेळी संस्थेचे संस्थापक अरुण पवार, जयपाल शेरखाने, संस्थेच्या उपाध्यक्ष कु. मोनाली जयपाल शेरखाने, धाराशिव शाखा व्यवस्थापक शिवप्रसाद काजळे, तुळजापूर शाखा व्यवस्थापक गजानन वैद्य, तसेच संस्थेचे कर्मचारी अमृता सोनटक्के, आकाश पवार, बापू पवार उपस्थित होते. याशिवाय दोन्ही शाखांचे फर्निचर काम करणारे उत्तर प्रदेशातील कारागीर फक्रुद्दीन अन्सारी यांचीही उपस्थिती होती.


 
Top