धाराशिव (प्रतिनिधी)- प्रगती सहकारी पतसंस्थेच्या वतीने नवीन वर्षाची दिनदर्शिका अनावरण सोहळा आज उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. संस्थेच्या सामाजिक, आर्थिक व सहकार क्षेत्रातील वाटचालीचा आढावा घेणारी ही दिनदर्शिका मान्यवरांच्या शुभहस्ते अनावरण करण्यात आली.

या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष प्रशांत नानासाहेब पाटील, उपाध्यक्ष  शाम लालासाहेब जाधव, सचिव डॉ.हर्षल राघवेंद्र डंबळ, संचालक नंदकुमार भुतेकर, शशिकांत वैराळे, रमाकांत घोडके, व्यंकटेश राजे मुख्य कार्यकारी अधिकारी  मोहन सावंत धाराशिव शाखा व्यवस्थापक हरी क्षिरसागर, कर्मचारी वर्ग व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. दिनदर्शिकेत संस्थेच्या विविध उपक्रमांची माहिती, सहकार क्षेत्रातील मार्गदर्शक संदेश, महत्त्वाच्या तारखा तसेच सामाजिक उपक्रमांचा आढावा देण्यात आला आहे. ही दिनदर्शिका सभासदांसह सर्वसामान्य नागरिकांसाठी उपयुक्त ठरेल, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात संस्थेच्या अध्यक्षांनी प्रगती सहकारी पतसंस्थेच्या भविष्यातील योजनांची माहिती देत सभासदांच्या विश्वासामुळेच संस्था सातत्याने प्रगती करत असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहन सावंत यांनी केले. तर आभार प्रदर्शन किशोर जगताप यांनी मानले.

 
Top