धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्हा दूध संघाचे माजी चेअरमन तथा आंबेजवळगे गावचे विद्यमान सरपंच नवनाथ राऊत, माजी उपसरपंच लक्ष्मण जाधव, शिवसेना उबाठा पक्षाचे अविनाश यादव, ज्ञानेश्वर जाधव यांनी जि.प. निवडणुकीतील आंबेजवळगे गटातील भाजपा महायुतीच्या उमेदवार रोहिणीताई श्याम जाधव तसेच पं. स. गणातील उमेदवार भाऊसाहेब धंगेकर यांच्या उमेदवारीला जाहीर पाठिंबा देत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. या सर्व मान्यवरांचे पक्षात स्वागत करून पुढील राजकीय व सामाजिक कार्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
यावेळी खंडेराव चौरे, सुनील काळे, आनंद कुलकर्णी, अनिल शिंदे, सत्यवान चांदणे, मोहन साबळे, मनोज रणखांब, अतुल देशमुख, सद्दाम शेख, संदीप शिंगाडे, बालाजी जाधव, नितीन कोळेकर, अमोल माळी,अमोल हाजगुडे आदी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
