तुळजापूर (प्रतिनिधी)- श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर येथे भारताचा 77 वा प्रजासत्ताक दिन अत्यंत उत्साहपूर्ण व शिस्तबद्ध वातावरणात साजरा करण्यात आला. या प्रसंगी तहसीलदार तथा मंदिर संस्थानच्या व्यवस्थापक (प्रशासन) माया माने यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीताचे सामूहिक गायन करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना देत अभिवादन केले.
या कार्यक्रमास लेखाधिकारी संतोष भेंकी, सहायक पोलिस निरीक्षक अर्जुन चौधर, सहायक व्यवस्थापक (स्थापत्य) राजकुमार भोसले, प्रवीण अमृतराव, सहायक व्यवस्थापक (विद्युत) अनिल चव्हाण, सहायक व्यवस्थापक (धार्मिक) अनुप ढमाले, रामेश्वर वाले, अमोल भोसले, जयसिंग पाटील, नागेश शितोळे, जनसंपर्क अधिकारी अभिजीत तेरखेडकर, विश्वास सातपुते, महेंद्र आदमाने, ओंकार काटकर यांच्यासह श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रम शांततापूर्ण व उत्साही वातावरणात पार पडला.
