धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव शहरातील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर संचलित रामकृष्ण परमहंस महाविद्यालयातील विवेकानंद वार्षिक अंक संपादक मंडळाच्या वतीने दि.26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी गुलमोहर भित्तिपत्रिका तयार केली होती. त्याचे प्रकाशन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संदीप देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.
या भित्तिपत्रिकेचे प्रकाशन केल्यानंतर प्राचार्य डॉ.संदीप देशमुख म्हणाले की, आपल्या महाविद्यालयाचा विवेकानंद वार्षिक अंक वाचनीय असतो व या संपादक मंडळाकडून वर्षभर गुलमोहर भित्तिपत्रिकेचे प्रकाशन केले जाते. यावेळी अंकाचे संपादक प्रा. राजा जगताप यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी उपप्राचार्य प्रा.बबन सूर्यवंशी, नॅक समन्वयक प्रा.डॉ.मंगेश भोसले, संपादक मंडळातील प्रा.डॉ.छाया दापके, प्रा. डॉ.केशव क्षीरसागर, प्रा.डॉ.अरविंद हंगरगेकर, प्रा.भाग्यश्री गोंदकर, प्रा.मोहन राठोड, प्रा.डॉ.वैभव आगळे, ग्रंथपाल मदनसिंग गोलवाल, सांस्कृतिक विभाग प्रमुख विवेकानंद चव्हाण, प्रा.डॉ.बालाजी गुंड, प्रा.डॉ.मारूती लोंढे, प्रबंधक सुमेर कांबळे उपस्थित होते. या अंकासाठी मराठी विषयातील बी.ए.भाग.1 मधील मीनाक्षी भावे, मीनाक्षी दळवी, शिवम कोळी, विवेक केवट या विद्यार्थी विद्यार्थिनींनी सहकार्य केले.
