कळंब (प्रतिनिधी)- कळंब एसटी बस आगारातील वाढत्या तक्रारी, बस बंद पडण्याचे प्रकार आणि व्यवस्थेतील ढिसाळपणाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने अखेर कडक निर्णय घेतला असून कळंब च्या आगार प्रमुखपदी विनोद अलकुंटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे . तरतत्कालीन प्रभारी आगार प्रमुख व कार्यशाळा अधीक्षक बालाजी भारती यांची धाराशिवला बदली करण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे आगारातील कामकाजाला शिस्त लागणार असून, निष्क्रिय व्यवस्थेला चांगलाच धक्का बसला आहे.
शिस्तप्रिय, कार्यक्षम आणि कामात तडजोड न करणारे अधिकारी म्हणून ओळख असलेले विनोद अलकुंटे यांच्या हाती जबाबदारी देण्यात आल्याने आगारात बदलाची ठिणगी पेटली आहे. बस वेळापत्रकातील अनियमितता, देखभालीतील हलगर्जीपणा, प्रवाशांच्या तक्रारी आणि कर्मचाऱ्यांच्या बेफिकीरपणावर आता थेट कारवाईचा बडगा उगारला जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
प्रवासी सेवा सुधारणा, बंद बस तातडीने मार्गावर आणणे आणि आगारातील एकूण कार्यक्षमता वाढवणे, हे अलकुंटे यांच्यासमोरचे मोठे आव्हान आहे. मात्र त्यांच्या नियुक्तीने प्रवाशांमध्ये अपेक्षा तर कर्मचाऱ्यांमध्ये धडकी भरल्याचे चित्र आहे.
कळंब बस आगार आता जुन्या कामकाजावर चालणार नाही, तर काम करणाऱ्यांनाच जागा आणि दुर्लक्ष करणाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला जाईल, असा स्पष्ट संदेश या नियुक्तीतून गेला आहे. प्रवासी कळंबकर आता प्रत्यक्ष बदल कधी दिसतो, याकडे लक्ष ठेवून आहेत.अगर प्रमुख यांनी पदभार स्वीकारल्यानंतर कळंब व सागरात विविध संघटनेच्या माध्यमातून त्यांचे स्वागत करण्यात आले आहे यावेळी गणेश गोरे , गणेश इंगळे , ऋषिकेश पवार, आर एस . पवार ,शिवाजी कदम ,श्री मते, श्री बांगर आदी कर्मचारी यावेळी उपस्थित होते .
