कळंब (प्रतिनिधी)- कळंब नगरपरिषदेत उद्धव बाळासाहेब ठाकरे नेतृत्वाखालील शिवसेनेने पुन्हा एकदा आपली ताकद दाखवून दिली आहे. ठाकरे गटाच्या नगरसेवकांनी एकमुखी निर्णय घेत सौ. सफुरा शकील काझी यांची कळंब नगरपरिषदेच्या गटनेतेपदी निवड केली. या निवडीमुळे कळंबच्या राजकारणात खळबळ उडाली असून विरोधकांच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे.

सामान्य जनतेच्या प्रश्नांवर आक्रमक भूमिका, प्रशासनाला जाब विचारण्याची ठाम भूमिका आणि नगरविकासाच्या मुद्द्यावर निर्भीड मते मांडणाऱ्या सौ. काझी यांच्या नेतृत्वाखाली आता ठाकरे गट अधिक आक्रमकपणे मैदानात उतरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. ही निवड म्हणजे केवळ पदाची नव्हे, तर कळंबच्या राजकारणात ठाकरे गटाच्या नव्या आक्रमक पर्वाची सुरुवात असल्याचे बोलले जात आहे. या निवडीमुळे येणाऱ्या काळात नगरपरिषदेत जनतेच्या प्रश्नांवर संघर्ष तीव्र होणार असून, भ्रष्टाचार, विकासातील दिरंगाई आणि प्रशासनाच्या हलगर्जीपणा विरोधात ठाकरे गट निर्णायक भूमिका घेणार, असा इशाराही यानिमित्ताने देण्यात आला आहे. सौ. सफुरा शकील काझी यांच्या गटनेतेपदी निवडीचे शहरभर स्वागत होत असून, ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. कळंब नगरपरिषदेत आता ‘लढाई ठरलेली आहे’ आणि नेतृत्व सौ. काझी यांच्या हाती आहे, हे मात्र नक्की.या निवडीबद्दल त्यांचा कार्यालयात आमदार कैलास पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला याप्रसंगी पॅनेल प्रमुख संजय मुंदडा, रश्मी मुंदडा , सचिन काळे ,नगरसेवक ज्योती हारकर , जमील खाटीक, इंदुमती हौसलमल, अशा भवर ,सागर मुंडे, वन मला वाघमारे, मोसीन मिर्झा, रुकसाना बागवान या वेळी उपस्थित होते . 


 
Top