भूम (प्रतिनिधी)- शंकरराव पाटील महाविद्यालय भूम येथील राष्ट्रीय सेवा योजना श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन वालवड येथे केलेले आहे. शिबिराच्या सहाव्या दिवशी आरोग्य तपासणीचे शिबिर आयोजन केले होते. यावेळी डॉ. आयशा खान वैद्यकीय अधिकारी भूम या व त्यांची टीम घेऊन त्या वालवड येथील राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरात पोहोचल्या व तेथील संपूर्ण स्वयंसेवकांची आरोग्य तपासणी केली. सोबतच नैसर्गिक धनसंपदा ही आरोग्याची गुरुकिल्ली आहे हे त्यांनी आपल्या मौलिक अशा व्याख्यानातून विद्यार्थ्यांना पटवून दिले. 

यावेळी या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. ए.एस. जगदाळे मॅडम, राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी डॉ. नितीन पडवळ, प्रा. डी जी गिरी, प्रा एन आर जगदाळे उपस्थित होते. तसेच प्रा भोंग, प्रा, मसराम, डॉ खराटे, प्रा डोंगरदिवे, डॉ भांडवलकर, प्रा, गायकवाड डॉ. माळी, डॉ, मोरे मॅडम, प्रा, अलगुंडे मॅडम, डॉ.तावरे मॅडम, प्रा कुटे, डॉ आगे, उपस्थित होते. सर्व विद्यार्थ्यां व गावकरी यांनी या शिबिरात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.


 
Top