भूम (प्रतिनिधी)- निवडणूक आयोगाने महाराष्ट्र राज्यातील बारा जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर केले असल्याने धाराशिव जिल्हा परिषद आणि तालुका निहाय पंचायत समितीच्या निवडणूक प्रोग्राम लागला असल्याने भूमचे उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी रेवैया डोंगरे आणि भूमचे तहसीलदार सह निवडणूक अधिकारी जयवंतराव पाटील आणि सह निवडणूक अधिकारी म्हणून प्रवीण जाधव नायब तहसीलदार यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन निवडणूक कार्यक्रम आणि त्या संदर्भातील माहिती सांगितली.
प्रामुख्याने या निवडणुकीमध्ये भूम तालुक्यातील पाच जिल्हा परिषद गट असून दहा पंचायत समिती गण आहेत. यामध्ये निवडणूक होणार असल्याने नामनिर्देशन पत्र घेण्याची तारीख 16 जानेवारी पासून ते 21 जानेवारी रोजी दुपारी दोन वाजेपर्यंत देण्यात येणार आहे. तर नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याची तारीख 21 जानेवारी दुपारी तीन वाजेपर्यंत सुरुवात राहणार आहे. तसेच नामनिर्देशन छाननी 22 जानेवारी रोजी करण्यात येणार आहे. वैध व अवैध यादी याच रोजी लावण्यात येणार आहे. उमेदवारी मागे घेण्यासाठी 23 जानेवारी ते 27 जानेवारी दुपारी तीन वाजेपर्यंत वेळ राहणार आहे आणि पात्र उमेदवार निवडणुकीत राहणारे यांना चिन्ह वाटप 27 जानेवारी दुपारी तीन वाजून 30 मिनिटानंतर देण्यात येणार आहे. मतदानासाठी दिनांक 5 फेब्रुवारी आणि निकाल सात फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
प्रामुख्याने जिल्हा परिषद गट मध्ये एकूण किती मतदान संख्या आहे अशी की, इट गटासाठी सर्वसाधारण महिला जागा असल्याने यासाठी एकूण मतदान 20563 मतदार आपले हक्क बजावणारा असून यामध्ये पुरुष दहा हजार 905 महिला 9658, गटासाठी नामाप्र महिला उमेदवार असल्याने या ठिकाणी 20899 इतके मतदान मतदार बजावणार आहेत. यामध्ये पुरुष 11129 महिला 9770, पाथरूड गटासाठी नामा प्र साठी आरक्षित असल्याने या ठिकाणी 19849 मतदान मतदार करणार आहेत. यामध्ये पुरुष10,616 आणि महिला 9233, वालवड गटासाठी नामाप्र महिलांसाठी प्रवर्ग असल्याने 19942 मतदान असून यासाठी मतदार मतदान करणार आहे. यामध्ये पुरुष दहा हजार सहाशे दोन आणि महिला 9340, आष्टा गटासाठी सर्वसाधारण आरक्षित असल्याने या ठिकाणी 20877 मतदान असून यामध्ये 11017 पुरुष आणि 9860 महिला आपले मतदान हक्क बजावणार आहे.
पंचायत समिती गणासाठी पाखरूड गन सर्वसाधारण महिलासाठी असून यामध्ये 9722 मतदार आपले मतदान हक्क बजावणार असून यामध्ये पुरुष 5175 महिला 4547, इट गणासाठी सर्वसाधारण असल्याने 10841 इतके मतदार आपले हक्क बजावणार असून 5730 पुरुष महिला 5111 मतदार आहेत. सुकटा गणासाठी नामा प्र आरक्षण असल्याने दहा हजार आठशे अकरा इतके मतदान होणार आहे. यामध्ये पाच हजार 737 पुरुष आणि पाच हजार 74 महिला, आरसोली गणासाठी सर्वसाधारण असल्याने 10088 इतके मतदान होणार असून पैकी पाच हजार 392 पुरुष आणि 4696 महिला, पाथरूड गणासाठी सर्वसाधारण असल्याने 5172 पुरुष आणि 4476 महिला, आंबिगन नामाप्र महिलांसठी असल्याने दहा हजार दोनशे एक मतदान आपले हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये पुरुष 5444 आणि महिला 4757, वालवड गणासाठी सर्वसाधारण महिला असल्याने या ठिकाणी 10264 मतदार आपले हक्क बजावणार असून, पुरुष 5440 आणि महिला 4824, चिंचोली गणासाठी अनुसूचित जाती महिला असल्याने 9678 एवढे मतदान होणार असून 5162 पुरुष आणि 4516 महिला मतदार आहेत. आष्टागनसाठी सर्वसाधारण महिला दहा हजार 908 इतके मतदान होणार असल्याने 5811 पुरुष आणि पाच हजार 97 महिला मतदार आहेत. माणकेश्वर गणामध्ये सर्वसाधारण जागा असल्याने 9959 एवढे मतदान असून पाच हजार दोनशे सहा पुरुष मतदान आणि 4763 महिला मतदान आहे. एकूण जि प आणि पसं साठी 102130 एवढे मतदान असून पुरुष 54269 तर महिला 4763 मतदान करणार आहेत. या निवडणुकीमध्ये आदर्श आचारसंहितेचा नियम सर्वांनी पाळावा असे सर्व राजकीय तसेच इतर लोकांना निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून रेवो या डोंगरे यांनी आव्हान केले आहे.
