धाराशिव (प्रतिनिधी)- परंडा नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी समरजितसिंह ठाकूर यांची निवड झाल्याबद्दल परंडा येथे त्यांचा औपचारिक सत्कार करण्यात आला. ते माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांचे सुपुत्र असून जनशक्ती नगर विकास आघाडीचे उमेदवार म्हणून त्यांनी ही जबाबदारी स्वीकारली आहे.
या प्रसंगी रुपामाता उद्योग समूहाचे चेअरमन व भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य ॲड. व्यंकटराव गुंड तसेच जिल्हा परिषद, धाराशिवचे माजी उपाध्यक्ष सुधाकर गुंड (गुरुजी) यांनी समरजितसिंह ठाकूर यांची सदिच्छा भेट घेऊन पुष्पहार अर्पण करत अभिनंदन केले. त्यांच्या भावी राजकीय व सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा व आशीर्वाद व्यक्त करण्यात आले. यावेळी अँड.गुंड यांनी उपनगराध्यक्षपदाच्या माध्यमातून परंडा शहराच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली.
