धाराशिव (प्रतिनिधी)- येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालय धाराशिव येथे विवेकानंद सप्ताहतंर्गत श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूरचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ज्ञानशिदोरी हा अभिनव उपक्रम महाविद्यालयाच्या ग्रंथालयामार्फत यशस्वीपणे राबविण्यात आला.
या अभिनव उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांना वाचनीय ग्रंथ श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मराठवाडा सह विभाग प्रमुख प्राचार्य डॉ जयसिंगराव देशमुख तसेच प्रभारी प्राचार्य डॉ संदीप देशमुख व ग्रंथपाल डॉ मदनसिंह गोलवाल यांच्या हस्ते भेट स्वरुपात देण्यात आले. तर यावेळी मा.प्राचार्य जयसिंगराव देशमुख यांच्या हस्ते ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले तसेच विवेकानंद सप्ताहाचे औचित्य साधून राष्ट्रीय सेवा योजना आणि एन सी सी तसेच जिल्हा रुग्णालय धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले, यावेळी एकुण 25 विद्यार्थ्यांनी रक्तदान केले.सदर प्रसंगी डॉ दत्तात्रय साखरे, डॉ केशव क्षीरसागर,प्रा माधव उगिले,प्रा बबन सुर्यवंशी, डॉ बालाजी गुंड,प्रा सचिन चव्हाण यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
