कळंब (प्रतिनिधी)- नववर्षाचे मुहूर्त साधत महायुतीच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ.सुनंदा शिवाजी कापसे यांनी भाजपा,शिवसेना,रिपाइं,ओबीसी अश्या अनेक वरीष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत पदभार स्वीकारला.यादरम्यान अनेक वरीष्ठ पदाधिकारी यांचे सत्कार करण्यात आले,मात्र ज्या कळंब भाजपा ने मागील वर्षभरापासून शहरात रामनवमी,राम मंदीर उत्सव,जनता दरबार,बुथ बांधणी,मन कि बात कार्येक्रम,विवीध योजनां,सरकार आपल्या दारी,मोफत वैद्यकीय तपासणी व औषधोपचार,लाडकी बहीण योजना,अशा अनेक कार्येक्रमांच्या माध्यमातून मकरंद पाटील यांनी संघटनेसोबत वाढवलेले जनसंपर्क व समाजाच्या शेवटच्या घटकाचा जनाधार मिळवला होता. जे घटक भाजप वर्ज्य समजत होते त्यांनी पण मतदान केले यासाठी मकरंद पाटील यांना श्रेय द्यावेच लागेल.
या निवडणुकीत भाजपाने शहराध्यक्ष मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली अत्यंत सुक्ष्मपणे आपली निवडणूक रणनीती आखत सर्वस्व पणाला लावून महायुतीच्या नगराध्यक्षांस प्रचंड बहूमत मिळवून दिले,कांहीं नगरसेवकांचा निसटता विजय झाला,तर कांहीं उमेदवारांना सर्वशक्तीनीशी लढूनही पराभव स्विकारावा लागला.
निवडून आलेल्या भाजपा व शिवसेना उमेदवारांची संख्यात्मक मर्यादा जनतेने देत काठावर बहूमत दिले आहे,महायुतीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला मिळालेले बहूमत पाहता महायुतीचे किमान तेरा ते चौदा उमेदवार निवडून यायला हवे होते,असे राजकिय जाणकारांचे मत आहे.मग माशी कुठे शिंकली ? या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा आम्हीही शोधण्याचा प्रयत्न केला.मात्र अद्याप हाती कांहीच लागले नसले तरी,यास कुठेतरी भारतीय जनता पार्टी व शिवसेना यांतील अंतर्गत धुसफुस कारणीभूत असावी असे जनतेत बोलले जाते.
यातच आता नगराध्यक्षांच्या पदग्रहण सोहळ्याप्रसंगी कळंब शहर भाजपाचे अध्यक्ष मकरंद पाटील,निवडणूक प्रसंगी विवीध माध्यमातून प्रचार यंत्रणा राबवणारे विवीध सामाजिक नेते,भारतीय जनता पार्टी व शिवसेनेच्या कोणत्याही नगरसेवकांचे सत्कार याप्रसंगी झाले नाहीत,याबाबत अनेक नेते व कार्यकर्त्यांनी आपली नाराजी व्यक्त करत,आता उपनगराध्यक्ष पदाचा पदग्रहण सोहळाही लवकरच होण्याकरीता,उपनगराध्यक्ष,विवीध विषय समित्या,स्विकृत सदस्य,याकरीता भाजपा आता ॲक्शन मोडवर असल्याचे बोलले जाते.