भूम (प्रतिनिधी)- राष्ट्रीय शालेय 69 व्या अजिंक्य कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राचा मुलींचा संघ देशात दुसरा ठरला आहे. या स्पर्धेत चमकदार खेळी करणाऱ्या स्वराज क्रीडा मंडळाची खेळाडू वैष्णवी बाबर हिचे भूम शहरात आगमन होताच जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी तिचे गोलाई चौकात फटाक्यांच्या अतिषबाजीत व फुलाची उधळण करीत गोलाई चौकापासून गांधी चौकापर्यंत वाजत गाजत जंगी मिरवणूक काढण्यात आली. ही राष्ट्रीय अजिंक्य कबड्डी स्पर्धा अहिल्यानगर जिल्ह्यात कोकमठाण येथे संपन्न झाल्या. या संघात भूम येथील स्वराज क्रीडा मंडळाच्या वैष्णवी बाबर हिने जोरदार कामगिरी करत आपल्या संघाच्या यशात सिंहाचा वाटा उचलला होता. या प्रसंगी स्वराज क्रीडा मंडळाचे राष्ट्रीय खेळाडू स्वराज मुळे, यशोदीप कांबळे, सुहास बाबर, साहिल जरडकर यांचीही उपस्थिती होती. यावेळी तिचा जंगी सत्कार करण्यात आला. 

यावेळी ॲड. सिराज मोगल, गोपाळ येळमकर, भरात साठे, महादेव कुटे, समाधान मिसाळ, निलेश व्हरे,अक्षय बाराते,स्वप्नील सुपेकर, अक्षय तिकटे, साक्षी मिसाळ, राजनंदिनी मिसाळ, राधिका जाधव, कुणाल भारती, अमित सुपेकर, संजय साठे, अभिजित देवरे, कैफ मोगल, आदित्य जगदाळे ,मयूर साठे, श्रेयश शिंदे, पार्थ साठे ,साहिल सुरवसे, विनायक आहेर, पृथ्वीराज हसवले, समाधान भोसले, अमित राऊत यांच्यासह स्वराज क्रीडा मंडळाचे खेळाडू मोठया संख्येने हजर होते.  तिला एनआयएस प्रशिक्षक, क्रीडा शिक्षक अमर सुपेकर यांचे मार्गदर्शन लाभले.

 
Top