कळंब (प्रतिनिधी)- कळंब नगर परिषद सर्वाधिक निवडणूक 2025 साठी कळंब नगर परिषदेच्या नगराध्यक्षा म्हणून शिवसेनेच्या सुनंदा शिवाजी कापसे या 2254 मताधिक्याने विजय झाल्या आहेत .त्यांनी मंगळवार  दिनांक 1 जानेवारी 2026 रोजी कळंब नगर परिषद कार्यालय येथे आयोजित भव्य समारंभात नगराध्यक्ष म्हणून सूत्रे स्वीकारली हलगीच्या कडकडात  नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ.सुनंदा शिवाजी कापसे  व निर्वाचित नगरसेवक यांनी रॅली द्वारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास  पुष्पहार अर्पण केला , हि रॅली  डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्या पुष्पहार अर्पण करण्यासाठी पोहोचली , यानंतर नगरपरिषद कार्यालय येथील मीटिंग हॉलमध्ये पदग्रहण समारंभ संपन्न झाला  प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, कळंब नगर परिषद निवडणूक प्रमुख माजी जीप बांधकाम सभापती दत्तात्रेय देऊळकर, शिवसेना नेते अजित पिंगळे, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती शिवाजी आप्पा कापसे , नगरपरिषद मुख्याधिकारी मंजुषा गुरमे यांची उपस्थिती होती या कार्यक्रमात आर.पी. आय आठवले पक्षाचे बंडूभाऊ बनसोडे, मुकुंद मामा साखरे तसेच निवडणूक व्यवस्थापक योगेश अंधारे यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमात उपस्थित प्रमुख पाहुण्यांचा नवनिर्वाचित नगरसेवकांनी सत्कार केला तर प्रमुख पाहुणे यांनी नूतन नगराध्यक्षांचा सत्कार केला तसेच कळंब नगर परिषद कार्यालयाच्या वतीने मुख्याधिकारी मंजुषा गुरमे यांनी नूतन नगराध्यक्षाचा फेटा, शाल, बुके देऊन सत्कार केला, यानंतर माजी सैनिक संघटनेच्या वतीने नूतन नगराध्यक्षांचा सत्कार करण्यात आला ,शिवसेना तालुकाध्यक्ष लक्ष्मीकांत हुलजुते, शिवसेना जिल्हा उपप्रमुख आनंत वाघमारे तसेच भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष मकरंद पाटील, तालुकाप्रमुख दत्ता साळुंखे, अरुण चौधरी,  नवनिर्वाचित नगरपरिषद सदस्य, शितल चोंदे, रोहन पारख, लखन गायकवाड, हर्षद अंबुरे, अमर चाऊस,  अतुल कवडे, भूषण करंजकर, योजना वाघमारे, पूजा धोकटे, शाला पवार यांच्यासह कार्यकर्त्यांची व नागरिकांची उपस्थिती होती. निर्वाचित नगराध्यक्ष सुनंदा कापसे यांनी शहराचा विकास योजना राबविण्याचे मतदारांना आश्वासन दिले आहे ते पूर्ण करण्यासाठी कटीबद्ध असल्याचे सांगितले तर दत्ताभाऊ कुलकर्णी, अजित पिंगळे, नितीन काळे यांनी  विकास योजना पूर्ण करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री प्रताप सरनाईक, भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचे पूर्ण सहकार्य राहणार आहे असे सांगितले व शंभर दिवसाचा विकासाचा कार्यक्रम राबविण्यात येईल असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुशील तीर्थकर यांनी केले.

Next
This is the most recent post.
Previous
Older Post
 
Top