परंडा (प्रतिनिधी)-  शेताच्या वादातून दोन गटात तुफान हाणामारी झाल्याची घटना लालुक्यातील भोत्रा येथे घडली. या प्रकरणी परंडा पोलीस ठाणे येथे तक्रारीवरून परस्परविरोधी दोन्ही गटातील 5 जणावर दोन स्वतंत्र गुन्हे दाखल झाले आहेत. भोत्रा येथील राजेंद्र ज्ञानदेव शिंदे, ब्रम्हदेव आबा शिंदे, धुळदेव आबा शिंदे व सुरज धुळदेव शिंदे (सर्व राहणार भोत्रा ) यांनी मागील भांडणाच्या कारणावरून दगड व कोयत्याने जबर वार करून गंभीर जखमी केले.ही घटना सोमवार दि.12 जानेवारी रोजी सकाळी घडली आहे.

सदरील प्रकरणी परंडा पोलीस ठाण्यात 3 जणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसऱ्या गटाकडून दिलेल्या फिर्यादीत माहिती दिली आहे की धुळदेव आबा शिंदे यांना राजेंद्र ज्ञानदेव शिंदे व ज्ञानदेव शिंदे विठ्ठल शिंदे (राहणार भोत्रा) यांनी शेतातील बांध कोरल्याच्या कारणावरून लाथा बुक्या व दगडाने मारहाण केली. या वेळी फिर्यादीचा मुलगा सुरज धुळदेव शिंदे व त्याचा भाऊ ब्रम्हदेव आबा शिंदे यांनाही शिवी गाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याने त्यानुसार दोघावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 
Top