तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजाभवानी महाविद्यालय तुळजापूर येथे श्री स्वामी विवेकानंद सप्ताह मध्ये  जागर :आधुनिक शिक्षण आणि तात्रंतनाचा या व्याख्यानमाला अंतर्गत शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे यांच्या स्वप्नातील गुरुदेव कार्यकर्ता  या विषयावर सखोल व विचारप्रवर्तक मार्गदर्शन करताना प्रा. डॉ. बापुराव पवार यांनी प्रतिपादन केले. 

या प्रसंगी प्रमुख व्याख्याते प्रा.डॉ.बापुराव पवार त्यांनी आपल्या व्याख्यानात सांगितले की, गुरुदेव कार्यकर्ता हा केवळ संघटनेचा घटक नसून तो निस्वार्थ सेवा, शिस्त, सामाजिक बांधिलकी आणि शिक्षणाद्वारे परिवर्तन घडविणारा असावा. शिक्षणमहर्षी  डॉ.बापूजी साळुंखे यांनी उभे केलेले शैक्षणिक कार्य हे ग्रामीण व वंचित समाजाच्या उत्थानासाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले. शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे यांच्या स्वप्नातील गुरुदेव कार्यकर्ता हा केवळ पदावरचा माणूस नसून तो विचारांचा, मूल्यांचा आणि सेवाभावाचा प्रतिनिधी असावा. अशी त्यांची अपेक्षा होती. त्यांची गुरुदेव कार्यकर्ता कसा असावा याविषयी  संकल्पना  स्पष्ट करताना डॉ. बापूराव पवार यांनी बापूजींच्या पंचसूत्रीचा उल्लेख केला त्याचबरोबर निस्वार्थ सेवावृत्ती , शिक्षणाला जीवनमूल्य मानणारा , आदर्श चारित्र्य व शिस्त असणारा , समतेचा आणि सामाजिक न्यायाचा पुरस्कर्ता , संघर्षशील पण संयमी व्यक्तिमत्त्वाचा , समाजाभिमुख आणि ग्रामीण वास्तवाशी जोडलेला , गुरुदेवांच्या विचारांशी निष्ठावान असावा तसेच बापूजी साळुंखे यांच्या विचारधारेवर निष्ठा, संघटनेच्या शिस्तीचे पालन आणि सातत्यपूर्ण कार्य ही गुरुदेव कार्यकर्त्याची ओळख असावी .असे प्रतिपादन केले.                                                                                                            

अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. जीवन पवार यांनी  शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे यांच्या विषयी बोलताना ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार या ध्येयासाठी समर्पित सत्य, चारित्र्य, प्रामाणिकपणा या मूल्यांचे पालन करणारा,  विद्यार्थ्यांमध्ये नैतिक आणि बौध्दिक विकास घडवणारा.गुरुदेव कार्यकर्ता म्हणजे बापूजींच्या विचारांचा आणि कार्याचा वारसदार जो स्वतःच्या कृतीतून ते विचार समाजात रुजवण्यासाठी झटतो, शिक्षण महर्षी बापूजी साळुंखे यांच्या स्वप्नातील गुरुदेव कार्यकर्ता हा केवळ शिक्षक नसून तो समाजपरिवर्तनाचा शिल्पकार आहे. शिक्षण हे जीवनोन्नतीचे प्रभावी साधन मानून तो ज्ञानासोबत संस्कारांची जोपासना करतो. विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाबरोबरच त्यांच्यात कर्तव्यनिष्ठा, स्वाभिमान, शिस्त, समता आणि सामाजिक भान निर्माण करणे हे त्याचे प्रमुख ध्येय असते.बापूजी साळुंखे यांच्या स्वप्नातील गुरुदेव कार्यकर्ता म्हणजे ज्ञान, सेवा आणि समाजबांधिलकी यांचा संगम जो शिक्षणाच्या माध्यमातून सशक्त, समताधिष्ठित आणि प्रबुद्ध समाज घडवतो. असे प्रतिपादन केले  सदर कार्यक्रमास कार्यक्रमास   समन्वयक, आणि वाणिज्य विभाग प्रमुख डॉ .नेताजी काळे, हिंदी विभाग प्रमुख डॉ .मंत्री आडे ,इंग्रजी विभाग प्रमुख डॉ . बालाजी कऱ्हाडे, राज्यशास्त्र विभागाच्या डॉ . स्वाती बैनवाड, प्रा.निलेश एकदंते, प्रा.सुदर्शन गुरव , डॉ. दत्तात्रय साळुंखे, प्रा.शिवाजी जगताप डॉ . शिवहार विभुते , प्रा .डॉ . फरजाना तांबोळी , अभिमन्यू  कळसे , प्रा .राणूबाई कोरे ,डॉ .शिवकन्या निपाणीकर , कनिष्ठ विभाग प्रमुख प्रा.अनिल नवरे, प्रा.कदम मॅडम प्रा जे.बी. क्षीरसागर  उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा .सिद्धेश्वर सुरवसे  यांनी केले .आभार प्रदर्शन डॉ .आबा गायकवाड यांनी व्यक्त केले .यावेळी महाविद्यालयातील सर्व गुरुदेव कार्यकर्ते शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top