उमरगा (प्रतिनिधी)- रोटरी क्लब उमरगा व व्यापारी महासंघ, उमरगा यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आल्या. याच्या उद्घाटन प्रसंगी उद्घाटक म्हणून उमरगा लोहारा तालुक्याचे आमदार प्रवीण स्वामी, उमरगा नगरीचे नगराध्यक्ष किरण गायकवाड, रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ.प्रा. धनंजय मेनकुदळे आदी प्रमुख उपस्थित होते.
या मॅरेथॉन स्पर्धेत लातूर, सोलापूर, धाराशिव, या जिल्ह्यातील स्पर्धक उपस्थित होते. या स्पर्धेत एकूण 180 स्पर्धकांनी भाग घेतला. यावेळी डॉ. दीपक पोफळे, क्लब सचिव प्रा. राजू जोशी, रो.डॉ. राजकुमार कानडे,रो. नितीन होळे पाटील, रो. कमलाकरराव भोसले, रो सोमशंकर महाजन, रो. देवप्पा सूर्यवंशी रो. संजय देशमुख, रो.जुगल खंडेलवाल, रो.प्रा. युसुफ मुल्ला, रो.ऍड. अक्षय तोतला, रो. परमेश्वर सुतार, रो. डॉ. प्रा. विनोद देवकर, रो. शिवकुमार लड्डा, रो. शिवकुमार दळवी रो. प्रा. डॉ. रवी आळंगे, आदी उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पंच म्हणून शाम दूधभाते, रोहित, तानाजी लेंडवे, संतोष जाधव, मालाजी काळे, येवते, रो. अनिल मदनसुरे व ओमसाई हेल्थ क्लबचे सदस्य इत्यादींनी पंच म्हणून उत्तम काम केले. तसेच शिवाजी महाविद्यालयातील एनएसएस यांच्या विद्यार्थ्यांनी देखील मदत केली. श्रीकृष्ण विद्यालय गुंजोटी या शाळेतील विद्यार्थ्याच्या ढोल पथकांनी मॅरेथॉनचे स्वागत केले.
