तुळजापूर (प्रतिनिधी)- मंगरूळ, ता. तुळजापूर येथील काँग्रेस पक्षाच्या विद्यमान सरपंच विजयालक्ष्मी महेश डोंगरे तसेच महेश डोंगरे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला. भाजपच्या विकासाभिमुख धोरणांवर विश्वास ठेवून व पक्षाच्या संघटनात्मक कार्यपद्धतीने प्रेरित होऊन त्यांनी हा निर्णय घेतला.
यांच्यासोबत ग्रामपंचायत सदस्य अप्पासाहेब जेठीथोर, सुनील डोंगरे, सुमित डोंगरे, सुधीर रोकडे, सोमनाथ रोकडे, भूषण डोंगरे, निलेश निकम, पंकज धुरगुडे, आदित्य डोंगरे, नितीन डोंगरे, अंबादास येळणे, नवनाथ खंडाळकर, संभाजी लबडे, अभय खोपडे, करण खंडाळकर, सुमित सावंत, शिवाजी खोपडे, दत्ता खंडाळकर, राजकुमार डोंगरे व मनोज धुरगुडे यांनीही भाजपात प्रवेश केला. या सर्व नवप्रवेशी पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे भारतीय जनता पार्टीत मनःपूर्वक स्वागत करून शुभेच्छा देण्यात आल्या. त्यांच्या प्रवेशामुळे मंगरूळ व परिसरात भाजपची संघटनात्मक ताकद अधिक बळकट होणार असून गावाच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. याप्रसंगी विजय गंगणे, विजय शिंगाडे, चित्तरंजन सरडे, स्वातीताई सरडे, प्रतापसिंह सरडे, आबासाहेब सरडे यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
