धाराशिव (प्रतिनिधी)-  शिवसेना उबाठा गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार कैलास पाटील यांचे विश्वासू सहकारी अशी ओळख असलेले धाराशिव पंचायत समितीचे माजी उपसभापती तथा चिलवडीचे माजी सरपंच  शाम जाधव यांनी भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला. 

आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी या प्रवेशाबद्दल भाजप पक्षात मनःपूर्वक स्वागत करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. भाजप जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. ही तर पक्ष प्रवेशाची सुरुवात आहे, आगामी काळात आणखी धक्के देऊ असे ते म्हणाले. यावेळी सुरेश देशमुख, नितीन काळे, नेताजी पाटील, नितीन भोसले, दत्ता देवळकर, राजाभाऊ पाटील, बालाजी गावडे यांच्यासह चिलवडी व परिसरातील कार्यकर्ते उपस्थित होते.


 
Top