परंडा (प्रतिनिधी)-  कै. महारुद्र मोटे ज्युनिअर कॉलेजची विद्यार्थीनी हिने पै.अहिल्या नवनाथ लवटे शालेय वुशू स्पर्धेमध्ये गोल्ड मेडलची मानकरी ठरली आहे. मणिपूर (इम्फाळ) येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये 19 वर्षे वयोगटातील राष्ट्रीय वुशू स्पर्धेमध्ये राजस्थान, छत्तीसगड, मनिपुर, हरियाणा येथून आलेल्या अनेक खेळाडूंना हरवून गोल्ड मेडल वरती आपले नाव कोरले.

आई-वडिलांच्या कष्टाचा फळ तसेच सर्व मंडळीचा आशीर्वाद आणि सर्व कोच यांनी घेतलेले कष्टाचा फळ आज मिळाले असं नक्कीच वाटत आहे. परंतु स्पर्धेच्या एक दिवस अगोदर वडिलांचा एक्सीडेंट झाला असताना ते दुःख मनात ठेवून फायनल मॅच जिद्दीने जिंकली व आई वडील तसेच शाळेचे नाव उज्वल केले. 

 
Top