तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजाभवानी महाविद्यालय तुळजापूर येथे विवेकानंद सप्ताहतंर्गत श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूरचे कार्याध्यक्ष मा.प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांचा वाढदिवस *ज्ञानशिदोरी दिन* विविध अभिनव उपक्रमाने महाविद्यालयात साजरा करण्यात आला.
महाविद्यालयातील ग्रंथालय विभाग यांच्या वतीने वाढदिवसाचे औचित्य साधून. ज्ञानशिदोरी दिनानिमित्त ग्रंथ प्रदर्शन, वाचन संकल्प, महाविद्यालयाचे प्राचार्य,प्रमुख पाहुणे, गुरुदेव कार्यकर्ते यांच्या हस्ते ज्ञानशिदोरी वाटप (विद्यार्थ्यांना वाचनीय पुस्तके,ग्रंथ वाटप) करण्यात आले. तसेच विविध उपक्रम मोठ्या उत्साहाने, यशस्वीपणे राबविण्यात आले. ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन मा. प्राचार्य जीवन पवार, प्रमुख पाहुणे ,गुरुदेव कार्यकर्ते यांच्या हस्ते करण्यात आले तसेच विवेकानंद सप्ताहाचे औचित्य साधून राष्ट्रीय सेवा योजना आणि एन सी सी यांच्या वतीने व उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे , आरोग्य तपासणी शिबिर याचे आयोजन करण्यात आले, यावेळी एकुण 30 रक्तदात्यांनी रक्तदान केले. 60 विद्यार्थी व विद्यार्थिनी यांच्या आरोग्य तपासणी अंतर्गत तपासणी रक्तगट तपासणी करण्यात आली. तसेच आदरणीय कार्याध्यक्ष साहेब यांच्या जन्मदिनानिमित्त महाविद्यालय व महाविद्यालय परिसरात मान्यवर, प्रमुख पाहुणे , महाविद्यालयाचे प्राचार्य यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. तसेच महाविद्यालयामध्ये मार्गदर्शन पर व्याख्यान प्रा. डॉ. विनोदकुमार वायचळ (हिंदी विभागप्रमुख, व्यंकटेश महाजन वरिष्ठ महाविद्यालय, धाराशिव) यांचे “स्वामी विवेकानंद आणि आजचा युवक” या विषयावर सखोल मार्गदर्शन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. इत्यादी विविध उपक्रमांनी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष मा. प्राचार्य डॉ. अभयकुमार साळुंखे यांचा 81 वा वाढदिवस मोठ्या उत्साहात आनंदात साजरा करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जीवन पवार, विवेकानंद सप्ताहाचे संयोजक आणि विभाग प्रमुख डॉ. मंत्री आडे, डॉ. बापुराव पवार. डॉ. नेताजी काळे, प्रा. बालाजी कऱ्हाडे, प्रा. स्वाती बैनवाड, ग्रंथपाल डॉ. दीपक निकाळजे,प्रा.गोकुळ बाविस्कर, प्रा. निलेश एकदंते , प्रा. सुदर्शन गुरव, प्रा. बाळू कुकडे, प्रा. राणुबाई कोरे, डॉ.तांबोळी मॅडम प्रा. ज्योतिर्लिंग क्षीरसागर, प्रा. सतीश वागतकर प्रा. अनिल नवत्रे, प्रा. शिवाजी जगताप, तसेच महाविद्यालयातील सर्व गुरुदेव कार्यकर्ते आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

