धाराशिव (प्रतिनिधी)- क्रीडा क्षेत्रात करियरच्या संध्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. या क्षेत्राविषयी पालकांची जागरूकता वाढलेली असली तरी फक्त करियर म्हणूनच नाही तर मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी क्रीडा क्षेत्राकडे पाहणे आवश्यक असल्याचे मत मुख्य लेखा व वित्त अधिकारी सचिन इगे यांनी व्यक्त केले.

राज्य क्रीडा दिन निमित्त धाराशिव जिल्हा स्केटिंग संघटनेच्या वतीने धाराशिव येथील तुळजाभवानी क्रीडा संकुलावर घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय स्केटिंग स्पर्धेचे पारितोषिक वितरण आणि राष्ट्रीय खेळाडू यांचा गौरव जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी सचिन इगे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विस्तार अधिकारी सचिन देवगिरे, धाराशिव जिल्हा रोलर स्केटिंग संघटनेचे अध्यक्ष ऍड जयंत जगदाळे, सचिव प्रवीण गडदे, कोषाध्यक्ष अभय वाघोलीकर, संचालक रवींद्र जाधव, किरण शानमे, स्पर्धा विभाग प्रमुख कैलास लांडगे, तांत्रिक समिती प्रमुख यशोदीप कदम आदींसह खेळाडू पालक यांची मोठ्या प्रमाणात उपस्तीथी होती. राज्य क्रीडा दिनानिमित्त घेण्यात आलेल्या जिल्हास्तर स्केटिंग स्पर्धेत 63 खेळाडू सहभागी झाले होते त्यांच्या पारितोषिक वितरणासह विविध क्रीडा प्रकारातील 21 राष्ट्रीय खेळाडूंना यावेळी गौरविण्यात आले.

 
Top