धाराशिव (प्रतिनिधी)-  आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उमरगा तालुक्यातील जिल्हा परिषद गटातील पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांची महत्त्वाची आढावा बैठक पार पडली. खासदार  ओमप्रकाश राजेनिंबाळकर आणि आमदार  प्रवीण स्वामी यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक झाली.

बैठकीदरम्यान कार्यकर्त्यांशी संवाद साधत स्थानिक प्रश्न, जनतेच्या अपेक्षा आणि संघटनात्मक बांधणी यावर चर्चा करण्यात आली. गावागावातील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी कार्यकर्त्यांनी सक्रिय राहावे, असे आवाहन करण्यात आले. “उमेदवार कोणताही असो, त्याला निवडून आणण्याची जबाबदारी सर्वांची आहे,” असे सांगत प्रामाणिक कामाच्या बळावर येणाऱ्या निवडणुकांत घवघवीत यश मिळवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. या बैठकीमुळे उमरगा तालुक्यातील राजकीय हालचालींना वेग आला असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

यावेळी आमदार प्रवीण स्वामी, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष केशव पाटील,माजी जिल्हा परिषद सदस्य दिपक जवळगे, सुलतान शेठ, तालुकाप्रमुख अमोल बिराजदार, अजित चौधरी, रणधीर पवार, सुधाकर पाटील, गुलाब मोरे, विजयकुमार नागने, विजयकुमार तळभोगे, अजित पाटील, धिरज बेळंबकर, शेखर पाटील, सालिम शेख, वहाब अतार,समाने सावकार, विठ्ठल साठे उपस्थित होते.


 
Top